SA vs PAK 2nd Test: दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले, रबाडाने गोलंदाजांना धुतला
GH News October 22, 2025 10:12 PM

दुसर्‍या कसोटी सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने पहिल्या डावात 113.4 षटकांचा सामना केला आणि 333 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. त्यामुळे पहिला डावात पाकिस्तान वरचढ ठरेल असं वाटलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेने हा अंदाज फोल ठरवला. कारण अवघ्या 235 धावांवर 8 खेळाडू तंबूत परतले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या हातात पहिला डाव होता. आरामात आघाडी घेईल असं वाटलं होतं. पण तळाच्या फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांचा घाम काढला. मुथुसामी आणि केशव महाराज यांनी नवव्या विकेटसाठी 92 चेंडूत 71 धावांची भागादारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे संघाची धावसंख्या 300च्या पार गेली. 306 धावा असताना केशव महाराजच्या रुपाने नववी विकेट पडली. शेवटच्या विकेटसाठी मुथुसामी आणि कागिसो रबाडा मैदानात होते. ही विकेट झटपट पडेल असं वाटलं होतं. पण झालं भलतंच..

मुथुसामी आणि रबाडा यांनी शेवटच्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. 117 चेंडूत त्यांनी या धावा ठोकल्या. यात रबाडाचं योगदान 71 धावांचं होतं. कागिसो रबाडाने 61 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 71 धावांची खेळी केली. तर मुथुसामाी 155 चेंडूत 8 चौकार मारत नाबाद 89 धावांवर राहिला. या दोघांच्या खेळीमुळे जिथे पाकिस्तानला आघाडी मिळणार तिथे दक्षिण अफ्रिकेला आघाडी मिळाली. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडू काढताना पाकिस्तानचे चार विकेट पडले.

दक्षिण अफ्रिकेकडून दुसऱ्या डावात सिमोन हार्मरने भेदक गोलंदाजी केली. त्याने 13 षटाकत 26 धावा देत 3 गडी बाद केले. तर कागिसो रबाडाने 1 विकेट घेतली. पाकिस्तानला 12 धावा असताना इमाम उल हकच्या रुपाने पहिला धक्का बसला. संघाच्या 16 धावा असताना धडाधड दोन विकेट पडल्या. अब्दुल्ला शफीक 6 धावांवर, तर शान मसूदला तर खातंही खोलता आलं नाही. सऊद शकीलने बाबर आझमसह भागीदारी केली. पण 11 धावा करून बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने 4 गडी गमवून 94 धावा केल्या. पाकिस्तानकडे दुसऱ्या डावात 23 धावा जमा झाल्यात. बाबर आझम नाबाद 49, तर मोहम्मद रिझवान नाबद 16 धावांवर खेळत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.