सोशल मीडियावर रीलच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. गेल्या दोन दिवसात ट्रेन समोर उभा राहून रीर करत असताना एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. यातच आता एका तरुणानं प्रसिद्ध होण्यासाठी दिवाळीत चक्क तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवण्याचा प्रयत्न केला. सात सुतळीबॉम्ब त्याने तोंडात पेटवून फोडले. पणआठवा सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर त्याचा जबडा तुटून पडला आहे. आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेशातील झाबुआ इथं ही घटना घडलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्य प्रदेशात झाबुआ जिल्ह्यात रील बनवण्याच्या नादात एका तरुणानं जीव धोक्यात घातला. तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून फोडल्यानं त्याचा जबडा तुटला आहे. तर चेहरासुद्धा होरपळला आहे. या घटनेनंतर तातडीनं त्याला रतलाम इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
वसई किल्ल्यावर शिवरायांच्या पोषाखात फोटो काढताना अडवलं, हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाचा मराठीत बोलण्यास नकार; VIDEO VIRALझाबुआ जिल्ह्यातल्या बाछीखेडा गावात बुधवारी सायंकाळी एक तरुण तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून तो पेटवायचा आणि टाकून द्यायचा. त्यानं एका पाठोपाठ एक असे सात सुतळी बॉम्ब फोडले होते. आठवा सुतळी बॉम्ब फोडताना त्याच्याकडून चूक झाली आणि मोठ्या स्फोटात त्याचा जबडा तुटून पडला. रोहित असं तरुणाचं नाव असून त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झालीय. गावातील काही मुलांसमोर रोहित आपण कसे डेंजर रील करतोय दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
स्थानिकांनी रोहितला जवळच्या रुग्णालयात नेलं. त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. सोशल मिडिया ट्रेंडच्या नादात त्यानं हा जीवावर बेतणारा प्रकार केल्याचं म्हटलं जातं आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा शूट करण्यात आला असल्याचं सांगण्यात येतंय.