पाकच्या अणुशस्त्राचा रिमोट कुणाकडे? सौदी अरबचे नाव घेत CIA अधिकाऱ्याचा तो खळबळजनक दावा
GH News October 25, 2025 12:09 PM

CIA John Kiriakou : पाकिस्तान अणुशक्ती आहे, तो केव्हा पण भारतावर हल्ला करू शकतो, अशा वल्गना पाकचे पुढारी नेहमी करतात. पण आता पाकिस्तानच्या अणुशक्ती, अणुशस्त्राची मोठी पोलखोल झाली आहे. शेजारीकडील अणुशस्त्राचा रिमोट पाक लष्कराच्या हातात नाही तर अमेरिकेकडे असल्याचा खळबळजनक दावा सीआयएच्या माजी अधिकाऱ्याने केला आहे. किराणा हिल्सवर पाक लष्कराचा नाही तर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेची गुप्तहेर संघटना CIA चे माजी अधिकारी जॉन किरियाकू यांनी पाकिस्तान, सौदी अरब आणि दक्षिण आशियातील राजकीय घडामोडींवर मोठे भाष्य केले. त्यांनी यावेळी अनेक रहस्य उलगडले. किरियाकू यांनी सांगितले की अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत केली आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना खरेदी केले. त्यावेळी तर अमेरिकेकडे पाकिस्तानमधील अणुशस्त्राचा रिमोट सुद्धा होता.

जॉन किरियाकू यांनी सीआयएमध्ये 15 वर्षांहून अधिक काळ काम केले. पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधातील अनेक मोहिमांमध्ये त्यांचा थेट सहभाग होता. ANI शी चर्चा करताना ते म्हणाले की अमेरिका हुकूमशाहांना अधिक जवळ करतो. कारण अशा देशात मग माध्यमांचा कोणताही दबाव नसतो. आम्ही मुशर्रफ यांना खरेदी केले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आम्ही आमच्या मर्जीने काम करत होतो.

मुशर्रफांचा दुहेरी खेळ

एकीकडे पाकिस्तानमधील अणुशस्त्र, अणुकार्यक्रम अमेरिकेकडे सोपविण्यात आला. दहशतवादाविरोधात अमेरिकेचे सहकार्य आवश्क असल्याचा देखावा करण्यात आला. पण मुशर्रफ हे धूर्त होते. त्यांनी ही सर्व मदत, शस्त्र भारताविरोधात दहशतवाद्यांना पुरवल्याचा दावा किरियाकू यांनी केला. पाकिस्तानी लष्कराला अल कायद्याची चिंता नव्हती. त्यांना भारताची कायम भीती वाटत आली आहे. मुशर्रफ दिखाव्यासाठी अमेरिकेसोबत असल्याचे नाटक बखुबी वठवत असल्याचा दावा किरियाकू यांनी केला. पण पडद्याआड मुशर्रफ हे भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सौदी अरबची पाकसोबत दोस्ताना

सौदी अरबचा पाकिस्तानसोबतच दोस्ताना आताचा नाही तर अनेक वर्षांपूर्वीचा आहे. किरियाकू यांनी अजून एक खळबळजनक दावा केला आहे. अणू वैज्ञानिक अब्दुल कादीर खान यांच्यावर अमेरिका मोठी कारवाई करणार होता. पण सौदी अरबने मध्यस्थी केली. त्यांनी खान यांना वाचवले. अमेरिका खान यांना संपवणार होती. पण सौदीने मध्यस्थी केल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. वाशिंग्टनने किरियाकू यांना पाकसोबत काम करायचे असल्याने पुढील कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते, असा दावा त्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.