मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने वार्षिक वेतन पॅकेज 96.5 मिलियन डॉलर म्हणजेच 846 कोटी रुपये दिले. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) मध्ये नडेला यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानंतर कंपनीने त्यांना पगारवाढीचे बक्षीस दिले आहे. या पॅकेजमध्ये नडेला यांचे मूळ वेतन 2.5 मिलियन डॉलर आहे, तर बाकीचे 90 टक्के हिस्सा हा स्टॉक अवॉर्ड्स आणि परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह म्हणून दिला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी नडेला यांची कमाई जवळपास 79.1 मिलियन डॉलर होती. या वेळी कंपनीने त्यांच्या पगारात 22 टक्के वाढ केली आहे. नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टने एआय टेक्नोलॉजीमध्ये बऱ्याच नव्या गोष्टी साध्य केल्या आहेत. कंपनीने ओपनएआयसोबत भागीदारी केली. को-पायलट एआय टूल्सला डेव्हलप करून मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केली. 2014 मध्ये सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे नेतृत्व सांभाळले होते. त्या वेळी कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 300 अब्ज डॉलर होते. आज कंपनीचे 3.4 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.








