SBI Bank Theft : धारूर तालुक्यातील एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या चोरी; शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपये लहान मुलाने लंपास केले
esakal October 25, 2025 01:45 PM

किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील शेतकरी सुमंत फुटाणे हे अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी धारूर येथील एसबीआय (हैदराबाद शाखा) बँकेत आले असता, दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली.

धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील शेतकरी सुमंत फुटाणे यांनी (ता.२४) रोजी दुपारी बँकेतून रक्कम काढून काउंटरवर चौकशी सुरू असतानाच, एका लहान मुलाने नकळतपणे त्यांच्या जवळील पन्नास हजार रुपयांचे बंडल उचलले व त्वरित पळ काढला. या मुलासोबत आणखी एक साथीदार मुलगाही उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे.

Selu Crime : वालूरमध्ये दरोड्याची साखळी; नातवाचा खून, आजी जखमी तर वृद्ध दाम्पत्यावरही खुनी हल्ला करून दागिने लंपास

घटनेनंतर ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या बँकेच्या परिसरात अशा प्रकारे चोरी घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बँक व्यवस्थापन व पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बँक सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.