गोरेगावमध्ये निसर्गभ्रमंतीचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः गोरेगाव (पूर्व) येथील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे रविवारी (ता. २६) ‘लेपर्ड ट्रेल’ या निसर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सफर बीएनएचएसच्या ३३ एकराच्या जंगलातील १ ते १.२ किमीच्या मार्गावर होणार असून, सहभागींच्या नजरेस रुफस वूडपेकर, टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर, कॉमन लेपर्ड बटरफ्लाय, प्रेईंग मॅन्टिस, लिंक्स स्पायडर्स अशा विविध पक्षी आणि कीटक प्रजातींचे दर्शन होऊ शकते. सकाळी आठ वाजता सीईसी सेंटर, गोरेगाव (पूर्व) येथे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी निम्नतम शुल्क निर्धारित करण्यात आले असून बीएनएचएस सदस्यांसाठी ६०० आणि इतरांसाठी ७०० असून यामध्ये प्रवेश तिकीट आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन समाविष्ट आहे.