Gadhinglaj Crime News : डहिंग्लज येथील शेंद्री रस्त्यावरील बंद असलेल्या ‘आठवण’ बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी एक किलो चांदीच्या मूर्ती, साडेतेरा तोळे सोन्याचे दागिने व रोख ३० हजारांवर डल्ला मारला. गुरुवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी चांदी व सोन्याची किंमत १२ लाख २० हजार इतकी नोंदविली असून, बाजारभावानुसार त्याची किमत १७ लाखांवर जाते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शेंद्री रस्त्यावर निर्मला पांडुरंग चव्हाण यांचा बंगला आहे. बंगल्याला कुलूप लावून निर्मला आपल्या मुली व जावयांसोबत बाहेर गेल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. आज सकाळी कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यावरून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याची कल्पना निर्मला यांना देण्यात आली.
घरात जाऊन पाहताच कपाटाचा लॉक तोडून त्यातील प्रत्येकी अर्धा किलोच्या दोन चांदीच्या मूर्ती, साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळ्याची चेन, मणीमंगळसूत्र, दोन तोळ्याची कर्णफुले, हिऱ्याची अंगठी, एक तोळ्याची कर्णफुले, हिऱ्याची कर्णफुले व रोख ३० हजार रुपये चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. निर्मला यांचे भाऊ रामदास कुराडे यांनी फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक पल्लवी पोवार तपास करीत आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते; परंतु श्वान घराच्या अवतीभोवतीच घुटमळल्याने चोरट्यांच्या माग काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ठसेतज्ज्ञांच्या पथकानेही घटनास्थळावरील ठसे संकलित केले.
Yellow Rain Kolhapur : काय सांगता! कोल्हापूरच्या कागल परिसरात चक्क पिवळा पाऊस, सोशल मीडियावर Video Viralगोव्याला फिरायला गेले, अन्...
निर्मला यांच्या दोन्ही मुली व जावई दिवाळीनिमित्त गडहिंग्लजला आले होते. सुटी असल्याने सर्व जण बुधवारी (ता. २२) दुपारी गोव्याला फिरायला गेले होते. निर्मला यांच्या बंगल्याशेजारीच त्यांची सख्खी बहीण हेमलता कुर्लेकर यांचाही बंगला आह; परंतु दिवाळीसाठी हेमलता मुलग्याकडे हैदराबादला गेल्या होत्या. त्यांचा बंगलाही बंदच होता. निर्मला यांच्या घरकामासाठी अनेक वर्षांपासून शहरातीलच एक महिला असते. त्यामुळे नेहमी या महिलेकडे घराची किल्ली देऊन त्या बाहेर जातात.
गोव्याला जातानाही घराची किल्ली या महिलेकडे दिली. बुधवारी रात्री ही महिला निर्मला यांच्या घरी झोपली. गुरुवारी (ता. २३) रात्री अकरापर्यंत ही महिला निर्मला यांच्या घरीच टीव्ही पाहत बसली होती. त्यानंतर निर्मला यांचा बंगला बंद करून ती महिला शेजारच्या हेमलता यांच्या घरी झोपण्यासाठी गेली होती.