आरोंद्यात भातशेतीचे पावसामुळे नुकसान
esakal October 25, 2025 01:45 PM

swt241.jpg
00169
आरोंदा ः परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

आरोंद्यात भातशेतीचे
पावसामुळे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २४ः सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, मळेवाड, आरोस, दांडेली, गुळदुवे, न्हावेली, तळवणे तसेच बाजूच्या गावांतील बरेच शेतकरी सध्या सुरु असलेल्या पावसामुळे धास्तावले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यामुळे कुजत असून कापणीयोग्य पीक जमीनदोस्त होत आहे. पेरणी करताना काही भागात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असतानाच पावसामुळे भातपिकाला परत कोंब येत आहेत. त्यामुळे कापलेले भात पीक सुकवून त्याची झोडपणी करण्याची चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच वाढती महागाई, त्यात ही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.