Chandrashekhar Bawankule : 'आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर बोलणारे संजय राऊत कोण? भाजपच्या डिजिटल वॉररूमवर टीका होताच बावनकुळे संतापले
esakal October 25, 2025 07:45 PM

नागपूर : ‘‘भाजप बूथप्रमुखांचे एक लाख व्हॉट्स ॲप ग्रुप पक्षाच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. या माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून होतो,’’ असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ते म्हणाले, की या ग्रुपवर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली जाते. नकारात्मक भावना नष्ट करून सकारात्मकता निर्माण केली जाते. यातून कार्यकर्ते व पक्ष यांच्यातील संवाद अधिक चांगला होतो. त्यामुळे, आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे ठरविणारे खासदार संजय राऊत कोण आहेत? असा प्रश्नही त्यांनी केला. ते म्हणाले की, निवडणुकीदरम्यान अनेक बातम्या येत असतात.

Washim Crime: आमखेड्यात समाजातील वादातून युवकाचा खून; चार गंभीर जखमी विनाक्रमांकाच्या दुचाकी सोडून हल्लेखोर फरार

आमच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट तपासण्याचे काम आमची यंत्रणा करते. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे एक लाख व्हॉट्स ॲप ग्रुप पक्षाने तयार केले आहेत व ते सर्व वॉर रूमसोबत जोडलेले आहेत. ही माहिती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहेच.

व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर काय काम केले पाहिजे, काय अडचणी आहेत ते सोडवण्याचे काम करतो. यावरून संजय राऊत यांना मिरच्या का झोंबल्या? असा प्रश्नही त्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.