Vande Bharat Express : पुण्याहून धावणार आणखी एक वंदे भारत, ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासात, वाचा कोणकोणते थांबे असतील?
Saam TV October 26, 2025 06:45 AM

Pune–Nanded Vande Bharat Express Update : पुणे-नांदेड या मार्गावर वंदे भारत धावणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालेय. पुणे आणि नांदेड (pune Nanded) या दोन शहरांच्या दरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) उद्घाटनाची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कनेक्टिव्हिटी, प्रवास सुकर होणार आहे. (pune Nanded new Vande Bharat Express 2025)

पुणे-नांदेड वंदे भारतमुळे किती वेळ वाचणार ?

पुणे-नांदेडया वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहेच. त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासात पूर्ण होणार आहे. रेल्वेने हा प्रवास करण्यासाठी १० तासांच्या आसपास वेळ लागतो. वंदे भारत एक्सप्रेसमुळे तीन तास वाचणार आहे.

Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार पुणे नांदेड वंदे भारत अधिकृत वेळापत्रक कधी ? Pune Nanded Vande Bharat Express launch date

नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पुणे-नांदेड या मार्गावर वंदे भारत सुर करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रस्तावाचा पाठपुरावा केला. त्यावर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलली आहेत. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे-नांडेड वंदे भारत एक्सप्रेसचे अधिकृत वेळापत्रक आणि उद्घाटन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वंदे भारत धावण्याची शक्यता आहे (Pune to Nanded Vande Bharat train timings)

भरधाव कारने ८ जणांना चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव पुणे नांदेड वंदे भारत कोण कोणते थांबे असणार ? Pune Nanded Vande Bharat route map

नांदेड शहराला डिसेंबरमध्ये दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. याआधी मुंबई-नांदेड ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. आता पुणे आणि नांदेड या दोन शहरांच्या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पुणे, दौंड, कुर्डूवाडी, धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे. (Pune Nanded train stoppages and schedule)

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO पुणे नांदेड वंदे भारत तिकिट किती असेल ? Pune Nanded Vande Bharat ticket price

एसी चेअर कारसाठी तिकिटांचे दर ₹१५००-₹१९०० आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ₹२०००-₹२५०० दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही गाडी आठवड्यातून पाच ते सहा दिवस धावू शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक संबंध मजबूत होतील. कृषी, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होईल.

Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.