Wi-Fi Tips: तुम्हाला रात्री नीट झोप येत नाही का आणि सकाळी उठताच थकवा जाणवतो का? याचे कारण तुमच्या खोलीत ठेवलेला वायफाय राउटर असू शकतो. हा राउटर दिवसरात्र चालू राहतो; त्याचे सिग्नल तुमच्या झोपेवर परिणाम करू शकतात. अनेक अहवालांनुसार, वायफायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी झोपेच्या समस्या निर्माण करतात. अशावेळी रात्री वायफाय बंद करावे केल्याय कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
तोटे काय आहेत?ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाच्या (२०२४) एका अहवालात असे म्हटले आहे की वायफायजवळ झोपणाऱ्या २७ टक्के लोकांना निद्रानाशासारख्या समस्या असतात. त्याच वेळी, २०२१ च्या अहवालात असेही आढळून आले की २.४GHz वायफाय सिग्नलमुळे त्यांची गाढ झोप कमी झाली. WHO आणि ICNIRP म्हणतात की वायफाय रेडिएशन इतके कमी आहे की त्याचा मानवी झोपेवर कोणताही मोठा परिणाम होत नाही.
Train Ticket Booking Tips: ट्रेन तिकीट बुक करताय? मग आधी 'हे' एक काम करा,मिळेल कन्फर्म तिकिट वायफाय बंद करण्याचे फायदेजर तुम्हाला झोपेची समस्या असेल, तर रात्री वायफाय बंद केल्याने तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला गाढ झोप लागेल. रात्रभर वायफाय बंद केल्याने वीज आणि इंटरनेट डेटा दोन्ही वाचतात. यासोबतच, राउटरचे आयुष्य देखील वाढते. वायफाय रेडिएशनमुळे नुकसान होत नसले तरी, रात्री ते बंद केल्याने मनाला शांती मिळते आणि अनावश्यक ताणतणाव संपू शकतो.
वायफाय कधी बंद करू नये?जर तुमच्या घरात कॅमेरा, स्मार्ट लाईट, व्हॉइस असिस्टंट सारखी स्मार्ट डिव्हाइस असतील तर वायफाय बंद केल्याने काम थांबेल. वायफायशिवाय स्मार्ट होम ऑटोमेशन वेळेवर सक्रिय होणार नाही. अशावेळी तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही राउटर बेडरूमच्या बाहेर ठेवू शकता जेणेकरून रात्री झोपताना सिग्नल कमी असेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.