महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या हातात एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये तिने एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. यानंतर त्या पोलीसावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ते दोघेही फरार आहेत. तर याबाबत आता अजून एक मोठा खुलासा समोर आला आहे.
सातारा येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव डॉ. संपदा मुंडे असे आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यांनी सुसाईड नोटच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी आरोपी पोलीसाला निलंबित केले आहे. तसेच त्यांची ओळख कशी झाली? गुन्ह्यातील तो दुसरा व्यक्ती कोण? या प्रश्नांची उत्तरे आता समोर आली आहेत.
Satara Crime : PSI चं नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं स्वत:ला संपवलं, 'तो' पोलिस अधिकारी निलंबित, आणखी धक्कादायक माहिती समोर येणार!डॉक्टर आत्महत्या प्रकरणी २ जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक व्यक्ती हा पोलिस उपनिरीक्षक असून दुसरी खाजगी व्यक्ती आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षक हे फलटण ग्रामीण पोलीसठाण्यात कार्यरत आहे. तर पोलीस उपनिरीक्षक हे फरार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दुसरी व्यक्ती ही पोलीस विभागातील नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेतील दुसरा आरोपी त्या महिला डॉक्टरचा घरमालक आहे.
फरार पीएसआय अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पीएसआय फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने संबंधित महिला डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये एकमेकांच्या संपर्कात आले होते. दोघेही मूळचे बीडचे आहेत. दुसरा व्यक्ती संबंधित डॉक्टर जिथे राहत होत्या तिथला खोलीचा मालक आहे. त्याचा शोध सुरू आहे.
Satara Doctor Case : चार वेळा बलात्कार करुन छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन, साताऱ्यात खळबळतपासादरम्यान पोलिसांना मृत महिलेकडून एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये तिने पोलीस अधिकाऱ्यावर चार महिने बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण वैद्यकीय समुदायात तीव्र दुःख व्यक्त होत आहे.