पुणे : फटाके वाजविताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कोरेगाव पार्कमध्ये घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली.
ओंकार बसूराज कोळी (वय २६), शुभम बसूराज कोळी (वय २६, दोघे रा. दरवडे मळा, कोरेगाव पार्क) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी तक्रारदार तरुण आणि मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी ओंकार आणि त्याचा भाऊ शुभम घरासमोर फटाके वाजवत होते. फटाके वाजवण्यावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपी कोळी यांनी तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी एकाला अटक केली. प्रेम विकी ससाणे (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवरत्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण लक्ष्मीपुजनाच्या दिवशी रात्री यशवंतनगर भागात थांबला होता. त्यावेळी वैमनस्यातून आरोपी ससाणे आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करून त्याच्यावर शस्त्राने वार केले.