Patanjali Credit Card : पतंजली कंपनी फक्त आयुर्वेदिक प्रोडक्ट्सच्या निर्मितीपर्यंत सीमित नाही. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी विशेष असे क्रेडिट कार्ड आणले आहे. पतंजलीने पंजाब नॅशनल बँक आणि आरबीएल बँकसोबत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणले आणले आहेत. या कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना विशष सूट, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स मिळणार आहेत. प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना फायदा व्हावा तसेच डिजिटल पेमेन्टला प्रोत्साहन मिळावे, यासाठी या कार्डची निर्मिती करण्यात आली आहे.
आरबीएल बँक पतंजली क्रेडिट कार्डमध्ये काय मिळणार?आरबीएल बँकेकडून दोन प्रकारचे पतंजली कार्ड दिले जात आहेत. यातील एक गोल्ड पतंजली क्रेडिट कार्ड आणि दुसरे प्लॅटिनम पतंजली क्रेडिट कार्ड आहे. जे ग्राहक पतंजली स्टोअरवरून खरेदी करतात त्या ग्राहकांना या कार्डचा खूप फायदा होणार आहे. या कार्डच्या मदतीने शॉपिंग केल्यास पतंजली स्टोअर्सवर तुम्हाला 10 ठक्के कॅशबॅक मिळणार आहे. सोबतच एअरपोर्ट लाऊंज अॅक्सेस, हॉटेलमध्ये थांबण्यासाठी तसेच चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठीही या कार्डमध्ये मोठी सूट देण्याची सुविधा आहे.
10 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळू शकतोआरबीएलच्या पतंजली प्लॅटिनम क्रेडिट कार्डमध्येबी 10 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो. हे कॅशबॅक जास्तीत जास्त 5000 रुपये प्रतिमाहपर्यंत असू शकते. आरबीएल पतंजली क्रेडिट कार्डवर वार्षिक फी आकारली जाते. निश्चित पैसे खर्च केल्यावर तुम्हाला ही फी परत दिली जाते.
पंजाब नॅशनल बँकेकडून कोणते कार्ड दिले जात आहे?पीएनबी बँकेकडूनही पतंजली क्रेडिट कार्ड दिली जात आहेत. या कार्ड्सची नावे रुपे सिलेक्ट आणि रुपे प्लॅटिनम अशी आहेत. या कार्डच्या मदतीने फक्त पतंजली स्टोअर्सवरच नव्हे तर अन्य ठिकाणीदेखील शॉपिंग करता येईल. शॉपिंग करून तुम्हाला रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक मिळवता येईल.
2500 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करत असतील तर..पीएनबी पतंजली क्रेडिट कार्डच्या पहिल्या ट्रन्झेक्शनवर तुम्हाला 300 पेक्षा अधिक रिवॉर्ड्स पॉइंट लगेच मिळतील. सोबतच वीमा कव्हरेज, 300 पेक्षा जास्त मर्चंट ऑफर्सचाही लाभ मिळेल. याशिवाय ग्राहक या कार्ड्सच्या मदतीने पतंजली स्टोअरवर 2500 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करत असतील तर त्यांना 2 टक्के (प्रति ट्रान्झेक्शन जास्तीत जास्त 50 रुपये) कॅशबॅक मिळेल.
…तर 5 ते 7 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेलयाशिवाय जे ग्राहक पतंजलीचे स्वदेशी समृद्धी कार्ड वापरतात त्यांनी पंजाब नॅशनल बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रिचार्ज किंवा ट्रान्झेक्शन केले तर 5 ते 7 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ही सुविधा विशेषत: पतंजलीच्या नियमित असलेल्या ग्राहकांसाठी आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन पतंजलीकडून करण्यात आले आहे.