Latest Marathi News Live Update : पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराबाबत "स्टे" कायम राहण्याची शक्यता
esakal October 28, 2025 12:45 AM
Pune Live : पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराबाबत "स्टे" कायम राहण्याची शक्यता
  • पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराबाबत "स्टे" कायम राहण्याची शक्यता

  • "स्टे" कायम ठेवून धर्मदाय आयुक्त हा व्यवहार रद्द करण्याचा आदेश देणार का?

  • पुणे विभागाच्या सह - धर्मदाय आयुक्त यांनी सदर केला आयुक्तांना अहवाल

  • धर्मदाय आयुक्त यांनी दिले होते सह धर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक निरीक्षक नेमून दिले होते सर्वेक्षणाचे आदेश

  • जैन मंदिरात भगवान महावीर यांचे मंदिर असल्याचे अहवालात नमूद, विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • उद्या मुंबईत धर्मदाय आयुक्तालयात होणार सुनावणी

  • धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्यासमोर होणार सुनावणी

Dive ghat live : दिवे घाटातील वाहतूक उद्या बंद राहणार
  • सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत दिवे घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

  • आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाटातील रस्ता रुंदीकरण सुरू

  • रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार

  • वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केलं आहे

Pune Live : बावधन रस्ता जाम, रस्त्यावर गाड्यांच्या रांगा

बावधन रस्त्यात ट्रॅफिक जाम झाले असून रस्त्यावर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत

Nashik News Updates : जमीन ट्रस्टच्या नावावर होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन समाजाचा इशारा

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी जैन समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात जैन समाजाकडून मोर्चा काढण्यात येत आहे. नाशिकमध्ये जैन बांधवांनी म्हटलं की, जैन समाजाची एकच मागणी आहे की, अन्याय सहन केला जाणार नाही. व्यवहार रद्द होऊन पुन्हा जमीन समाजाच्या नावावर होत नाही तोवर हा लढा सुरूच ठेवणार असं म्हणत आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

Nandurbar News Updates : नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांचं नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांचा घास हिरावला. नवापूर तालुक्यातील खेकडा झामणझर परिसरात भात शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. सोमवेल कुवर या शेतकऱ्यांचे तोडणीवर आलेली भात शेती पाण्यात वाहून गेलीय. खेकडा झामणझर गावातील शेतकऱ्याने लावलेल्या चार ते पाच एकर भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Pune News Live Updates : जमीन व्यवहारावरून जैन बोर्डिंग ट्रस्टींमध्येच मतभेद, एकाचा राजीनामा

जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टीनमध्येच मतभेद उघड

या संपूर्ण जमीन व्यवहार प्रकरणांमध्ये ट्रस्टी व दबाव आणून राजीनामा घेतल्याची चकोर गांधी यांचा दावा

6 ऑक्टोंबरला चकोर गांधी यांनी एचएनडी ट्रस्टचा दिला होता राजीनामा

अर्धवट माहिती देऊन या व्यवहारात माझी सही घेतल्याचा चकोर गांधी यांचा दावा

अनेक वेळा ट्रस्टीना सांगून सुद्धा हा व्यवहार रद्द झाला नाही...

6 ऑक्टोबर रोजी धर्मदाय आयुक्ताकडे चकोर गांधी यांनी दिला आहे राजीनामा

Ahilyanagar News Updates : दगडफेकीचा आरोप, आमदाराच्या पीएचं महिन्याभरानं आत्मसमर्पण

दगडफेक प्रकरणातील आरोपी, आमदारांचा स्वीय्य सहाय्यक एक महिन्यानंतर पोलिसांना शरण एक महिन्यापूर्वी कोपरगाव शहरात दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक झाल्याची घटना घडली होती.. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचा स्वीय्य सहाय्यक आरोपी अरुण जोशी अखेर एक महिन्यानंतर पोलिसांना शरण आलाय.. अरुण जोशी आणि इतर काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी अरुण जोशीसह इतर तीनजण स्वतःहून कोपरगाव पोलिसांना शरण आलेत..

Manipur News : चार बंडखोरांना मणिपूरमध्ये अटक

इंफाळ : मणिपूरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या विविध संघटनांशी संबंधित चार बंडखोरांना सुरक्षा दलांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. थौबल जिल्ह्यातून बंदी घालण्यात आलेल्या ‘पीआरईपीएक’ (प्रो) या संघटनेचे दोन सदस्य, कांगलेपाक कम्युनिस्ट पार्टी (तैबांग गानबा) आणि कांगलेई याओल कन्ना लुप (केवायकेएल) या संघटनेचे प्रत्येकी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले.

Kolhapur rain : अवकाळीने उडाली दाणादाण; कोल्हापूर शहरासह परिसरात जोरदार सरी, पिकांचे नुकसान

कोल्हापूर : शहरात आलेले पर्यटक आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक यांच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले. बाजारपेठतील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे दोन तास पाऊस पडला. रात्री उशिरा काही भागात सरी बरसल्या. शेतीच्या कामातही अडथळा आणला. दरम्यान, जिल्ह्याच्या सर्वच भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांचीच पंचाईत झाली. कापलेले भात वाळवायचे कसे, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. काही ठिकाणी पीक जमीनदोस्त झाले आहे.

Pune-Bangalore National Highway : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण झाले. राष्ट्रीय महामार्गावर गेले काही दिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता

पुणे : कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Jain Boarding Trust : जैन बोर्डिंगचा जागेचा व्यवहार बिल्डरने केला रद्द

पुण्यातील जैन बोर्डींग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखलेंनी घेतला आहे. जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ई-मेलद्वारे ट्र्स्टला कळवल्याचे समोर आले आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय.

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ टोळीतील सदस्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक

निलेश घायवळ खंडणी प्रकरणी फरार असलेल्या तरुणाला अटक केलीये. अमोल उर्फ गोरख बबन बंडगर असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेने भिगवण येथे जाऊन बंडगर याला ताब्यात घेतले. त्याच्यावर या आधी भिगवण, वालचंद नगर, बारामती पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Election Commission : निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद

निवडणूक आयोग आज दुपारी सव्वाचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच, SIR संपूर्ण देशभरात (SIR voter list) करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सकाळी 10:30 वाजता नेस्को सेंटर गोरे गाव, मुंबई येथे इंडिया मेरीटाईम वीक 2025 च्या उद्घाटनप्रसंगी संबोधित करणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 

BJP MP : बिहारमध्ये भाजपच्या खासदाराला धमकी

बेतिया (बिहार) : दहा कोटी रुपये दिले नाहीत तर त्यांच्या मुलाला ठार करण्यात येईल, अशी धमकी भाजपचे खासदार संजय जैस्वाल यांना शुक्रवारी (ता.२४) दूरध्वनीवरून देण्यात आली आहे, अशी माहिती बेतिया शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक दीप यांनी रविवारी दिली. दूरध्वनी करणारी व्यक्ती गुन्हेगार संघटनेशी संबंधित असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

Kolhapur News : कोल्हापुरात वाघनखे प्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

कोल्हापूर : राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्फे आयोजित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे मंगळवारी (ता.२८) सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ठेवण्यात येणार आहेत.

Satara Doctor Case : 'गुन्हेगारांना सरकारचे संरक्षण'; राहुल गांधी यांचा घणाघात

Latest Marathi Live Updates 27 October 2025 : फलटणच्या शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यात संतापाचे वातावरण असतानाच आज याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. संबंधित महिला डॉक्टरची आत्महत्या नसून, ती ‘संस्थात्मक हत्या’ असल्याचा आरोप राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. तसेच राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्फे आयोजित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे मंगळवारी (ता.२८) सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.