रांगोळी प्रदर्शनातून साकारल्या अभिनयाच्या छटा
esakal October 28, 2025 12:45 AM

रांगोळी प्रदर्शनातून साकारल्या अभिनयाच्या छटा
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः संस्कृती प्रतिष्ठान कांजूरमार्ग यांनी आयोजित केलेल्या ‘दशावतार’फेम दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या छटा रांगोळी प्रदर्शनातून मांडण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक बाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी सुधाकर पेडणेकर, दीपक सावंत, सचिन चोरमुले, शैलेश तारकर, प्रदीप पवार, संतोष पासलकर, अभिलाष पवार, संतोष गोनभरे, अभय खानविलकर, अमित प्रभू, रसिक हडकर, विशाल सारंग आदी उपस्थित होते. प्रदर्शन पाहण्यासाठी कांजुर, भांडुपवासीयांनी गर्दी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.