Smartphone Launch November 2025 : नोव्हेंबेर महिना स्मार्टफोन प्रेमींसाठी एकदम खास! लाँच होणार 'हे' 5 बजेटमधले ब्रँड मोबाईल
esakal October 29, 2025 06:45 AM

New mobile launch : भारतातील स्मार्टफोनप्रेमींनो.. नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खास ठरणार आहे. वनप्लस, व्हिवो, ओप्पो, आयक्यू, रियलमी आणि नथिंगसारख्या मोठ्या कंपन्या आपले फ्लॅगशिप आणि मिडरेंज फोन लॉन्च करणार आहेत. बजेटपासून ते प्रीमियमपर्यंत प्रत्येक कॅटेगरीत स्पर्धा वाढणार असून ग्राहकांना भरपूर पर्याय मिळणार आहेत. चला तर मग पहा या महिन्यात येणाऱ्या टॉप स्मार्टफोनची झलक

वनप्लस 15 सिरीज (Oneplus 15 series)

वनप्लस 15 सिरीज नोव्हेंबरमध्ये भारतात दाखल होणार. यात 6.78 इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 चिपसेट आणि 7300 mAh दमदार बॅटरी असेल. 120 वॅट फास्ट चार्जिंग आणि 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा यामुळे हा फोन गेमिंग आणि फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी परफेक्ट ठरेल. फ्लॅगशिप लेव्हलचा हा फोन स्पीड आणि स्टायलचा उत्तम संगम असेल

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच ओप्पो फाइंड के9 सिरीज (Oppo fined k9 series)

18 नोव्हेंबरला लॉन्च होणाऱ्या ओप्पो फाइंड के9 सिरीजमध्ये 6.78 इंच एलटीपीओ एमोलेड स्क्रीन, मीडियाटेक डायमेंसिटी 9500 प्रोसेसर आणि 200 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असेल. 80 वॅट वायर्ड आणि 50 वॅट वायरलेस चार्जिंगसह हा फोन झूम फोटोग्राफीमध्ये टॉपचा ठरेल. प्रोफेशनल फोटो काढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच आयक्यू 15 (IQ15)

25 नोव्हेंबरला जागतिक लॉन्च होणारा आयक्यू 15 मध्ये 7000 mAh बॅटरी, 100 वॅट फास्ट चार्जिंग आणि 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. हा फोन लांब चलणाऱ्या बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जाईल.

रियलमी जीटी 8 प्रो (Realme GT8 Pro)

रियलमी जीटी 8 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, 2के डिस्प्ले आणि 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल. गेमर्ससाठी हा फोन सुपर स्मूथ अनुभव देणार आहे

दिवाळी संपताच DMartमध्ये जास्त स्वस्तात का मिळतायत वस्तू? खरेदीला जाण्यापूर्वी सगळ्या ऑफर्सचं सिक्रेट बघाच

नथिंग फोन 3A लाइट बजेट ग्राहकांसाठी 20,000 ते 22,000 रुपयांत येईल. लावा अग्नी 4 5Gमध्ये backstory डायमेंसिटी 8350 चिप आणि 7000 mAh बॅटरी असेल. व्हिवो एक्स300 प्रोमध्ये 6.78 इंच डिस्प्ले, डायमेंसिटी 9500 चिप आणि 200 मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा असेल.

नोव्हेंबरमध्ये एवढे फोन लॉन्च होत असल्याने बाजारात स्पर्धा वाढेल. बजेट फोनपासून ते फ्लॅगशिपपर्यंत प्रत्येकाला आपला आवडता फोन मिळेल. कोणता फोन घेणार?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.