केडगावच्या बाजारात गव्हाची ५६० क्विंटल आवक
esakal October 29, 2025 11:45 PM

दौंड, ता. २९ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात गव्हाची आवक होऊन बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव येथे गव्हाची ५६० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २६५० रुपये तर कमाल ३००१ बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस, यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर असल्याचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, सचिव मोहन काटे यांनी सांगितले. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक आणि बाजारभाव स्थिर आहेत.
दौंड बाजारात कोथिंबिरीची १६०१५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० आणि कमाल १२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १५०० रूपये, तर कमाल २८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची १०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० रूपये, तर कमाल १५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची ५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल १००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रूपये) कमाल (रूपये)
गहू ७२९ २३०० ३००१
ज्वारी १३८ २००० ४२११
बाजरी ५९७ १६०० ३२००
हरभरा ३ ४८०० ५५००
मका ६५४ १६५० २०००
उडीद ११६ ३७०० ५६००
तूर १० ५५०० ६०००
मूग ३५ ७००० ८०००

दौंड मुख्य बाजारात भाजीपाला आणि फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा - २१०, आले - ४००, गाजर - ३५०, पेरू - १५०, काकडी - २५०, भोपळा - १७०, कोबी - २५०, फ्लॅावर - २७५, टोमॅटो - १८०, हिरवी मिरची - ५७०, भेंडी - ३००, कार्ली - ३५०, दोडका - ५००, वांगी - ३५०, सिमला मिरची - ६००, गवार - १८००, घेवडा - ६००, बिट - २००, डाळिंब - ७००, मका कणीस - १००, लिंबू - २५०.

■ कांद्याच्या दरात वाढ
केडगाव उपबाजारात कांद्याची ५५५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये तर कमाल २२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ५४२६ क्विंटल झाली होती. त्यास प्रतवारीनुसार किमान १५० रुपये तर कमाल १६०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

■ भोपळा, दोडका, गवारीच्या भावात घट
दौंड मुख्य बाजारात भोपळ्याची २८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १७० रूपये, असा दर मिळाला. दोडक्याची २९ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ५०० रूपये, असा दर मिळाला. गवारीची १३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३०० तर कमाल १८०० रूपये, असा दर मिळाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.