प्रेरक व्यक्तिमत्त्व
जनतेच्या मनात घर करणारे, कार्यातून विश्वास जिंकणारे आणि विकासाच्या प्रत्येक पायरीवर जनतेला साथ देणारे नाव म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटीलसाहेब. त्यांच्या कार्यात संयमाची झळाळी, निर्णयात प्रगल्भतेची झाक आणि लोकसेवेत निखळ प्रामाणिकपणा दिसून येतो. आज ते केवळ एक राजकारणी नाहीत, तर जनतेच्या आशा-आकांक्षांचा आधारस्तंभ बनले आहेत.
- सागरअप्पा दंडवते, युवा उद्योजक
गावपातळीवरील लोकसेवेपासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंतचा दिलीपरावजी वळसे पाटील यांचा प्रवास हा एक आदर्श लोकनेत्याचा प्रवास ठरतो. आंबेगाव- शिरूर या मतदारसंघात त्यांनी विकासाची नवी उंची गाठली आहे. त्यांनी रस्ते, शिक्षण संस्था, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा, शेतीविकास या सर्वच क्षेत्रांत अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी निर्माण केलेल्या आधुनिक शिक्षण संस्थांमुळे हजारो कुटुंबांची स्वप्ने साकार झाली आहेत.
राज्याच्या राजकारणात शांत, संयमी आणि अभ्यासू नेते म्हणून दिलीपरावजी वळसे पाटील यांची ओळख आहे. सिंचन प्रकल्पांची गती, शेतमालाला योग्य भाव, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत त्यांनी टाकलेली पावले जनतेसाठी दिलासादायक ठरली आहेत. त्यांच्या निर्णयांनी हजारो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणि घरात समाधान आणले आहे.
‘राजकारणात विचारांचा सुसंवाद आवश्यक आहे,’ हा विचार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आपल्या आचरणातून जपला आहे. विरोधकांनाही सन्मानाने वागवणारे, प्रशासनाशी सुसंवाद राखणारे आणि लोकांशी थेट नाळ जोडणारे नेते म्हणून वळसे पाटील सर्वपक्षीय नेत्यांचे आदराचे केंद्रबिंदू बनले आहेत. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात सन्मानाचा नवा अध्याय लिहिला आहे.
दिलीपरावजी वळसे पाटील यांनी राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारणात नवे अध्याय रचले. आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, तरुणांसाठी प्रशिक्षण व रोजगार उपक्रम यामधून त्यांनी लोकांच्या जीवनाला नवी दिशा दिली.
त्यांचा प्रत्येक उपक्रम ‘जनतेच्या हितासाठी’ या भावनेतूनच जन्म घेतो. जनतेचा विश्वास, विकासाचा आधारस्तंभ आणि समाजकारणातील प्रेरक व्यक्तिमत्त्व मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रेरणादायी कार्यासाठी सदिच्छा... वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...!
(शब्दांकन- सागर रोकडे)