Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंद'; ४० कोटींचा व्यवहार ठप्प; राज्यव्यापी लाक्षणिक संप, साथी पोर्टलला विरोध
esakal October 29, 2025 11:45 PM

सोलापूर: साथी पोर्टलच्या विरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक बंदमुळे मंगळवारी (ता. २८) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रेही बंद राहिली. सर्व विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून या संपात सहभाग नोंदवल्याने सुमारे ३०-४० कोटींचा व्यवहार ठप्प झाला.

Solapur Politics:'साेलापुरात शिवसेना नसेल तर राष्ट्रवादी, माकपला सोबत घेऊ'; शिवसेनेच्या आघाडी न करण्यावर काँग्रेसची भूमिका..

केंद्र सरकारने खतानंतर आता बियाणे विक्री व वितरण साथी पोर्टलद्वारे करणे बंधनकारक केले आहे. सर्व बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांसाठी ही प्रणाली अनिवार्य आहे. याची अंमलबजावणी थांबविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राज्यव्यापी संप पुकारला होता. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून या संपात सहभाग नोंदवला.

शहरासह जिल्ह्यातील सर्व एक हजार ८०० कृषी सेवा केंद्रे बंद राहिली. परिणामी जिल्ह्यात दररोज होणारा ३० ते ४० कोटींचा व्यवहार ठप्प झाल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. तर बियाणे उत्पादक कंपन्या पिशव्यांवर क्यूआर कोड वापरू लागले आहेत. त्याद्वारे बियाणांची माहिती उपलब्ध होणार असल्याने विक्रेत्यांच्या स्तरावर साथी पोर्टलची आवश्यकता नाही. माहिती भरणे विक्रेत्यांना अशक्य आहे.

Ujani Dam: 'उजनीतून यंदा शेतीसाठी तीनदा सुटणार पाणी'; जानेवारीअखेर पहिले आवर्तन; ‘कालवा सल्लागार’मध्ये होणार अंतिम नियोजन

साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री ही वितरकांच्या स्तरावरच ठेवावी. ती विक्रेत्यांना परवडणारी नसल्याने याची अंमलबजावणी होऊ नये. पोर्टलच्या विरोधातील संपात जिल्ह्यातील एक हजार ८०० कृषी सेवा केंद्रे सहभागी झाली. सर्व दुकाने बंद राहिल्याने सुमारे ३०-४० कोटींचे नुकसान झाले आहे. सरकारने या मागणीचा विचार केल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल.

- बालाजी चौगुले, सचिव, सोलापूर सीड्स फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड्स असोसिएशन, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.