आजकाल प्रत्येकजण त्यांच्या गोपनीयतेबद्दल चिंतेत आहे. कारण सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. हॉटेलमध्ये लपलेले कॅमेरे सापडल्याची काही प्रकरणे देखील समोर आली आहेत. हॉटेलची खोली ही त्यात राहणाऱ्या लोकांची वैयक्तिक जागा असते; तिथे कॅमेरा असणे केवळ त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत नाही तर कायद्याचे उल्लंघन देखील आहे. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करता तेव्हा तिथे लपलेला कॅमेरा बसवला आहे की नाही हे तपासले पाहिजे. लपलेला कॅमेरा ओळखण्यासाठी पुढील गोष्टी स्टेप बाय स्टेप करून पाहा.
पुढील गोष्टी बारकाईने चेक कराजेव्हा तुम्ही हॉटेलच्या खोलीत किंवा भाड्याच्या घरात पोहोचता तेव्हा सर्वातआधी काळजीपूर्वक आजूबाजूला पाहा. स्मोक डिटेक्टर, घड्याळ, इलेक्ट्रिकल सॉकेट्स, भिंतीवरील सजावट किंवा आरशांवर लक्ष ठेवा. जर एखादी गोष्ट अनोळखी ठिकाणी ठेवली असेल किंवा इतर गोष्टींपेक्षा वेगळी दिसत असेल तर ती अधिक बारकाईने तपासा. कधीकधी लपविलेले कॅमेरे अशा गोष्टींमध्ये देखील लपलेले असतात.
आरसा काळजीपूर्वक तपासाअनेकवेळा असे घडते की लपलेला कॅमेरा आरशांच्या मागे लपलेला असतो. ते तपासण्यासाठी, तुमचे बोट आरशावर ठेवा. जर तुम्हाला तुमच्या बोटाच्या आणि त्याच्या प्रतिबिंबाच्यामध्ये अंतर दिसले तर समजून घ्या की आरसा सामान्य आहे. जर तुम्हाला कोणतेही अंतर दिसत नसेल, तर आरसा दुतर्फा असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या मागे कॅमेरा असू शकतो.
लपलेले कॅमेरे वाय-फायशी कनेक्ट केले जाऊ शकतात.अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे वाय-फायशी जोडलेले असतात. तुमच्या फोनची वाय-फाय सेटिंग्ज ओपन करा आणि त्या नेटवर्कशी कोणते डिव्हाइस कनेक्ट केलेले आहेत ते पाहा. जर तुम्हाला कोणत्याही अज्ञात डिव्हाइसचे नाव, जसे की एखादा विचित्र कोड किंवा डिव्हाइस दिसले, तर ते तुमच्या गोपनीयतेचे उल्लंघन करू शकते. तुम्ही अशा अॅप्स वापरू शकता जे नेटवर्कशी कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसची यादी दर्शवतात.
रेडिओ फ्रिक्वेन्सी डिटेक्टर वापरातुम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी डिटेक्टर खरेदी करू शकता. ज्याचा वापर करून तुम्ही लपलेल्या कॅमेऱ्यांमधून किंवा मायक्रोफोनमधून येणारे सिग्नल ओळखू शकता. ते खोलीभोवती हळू हळू फिरवा. जर ते बीप झाले किंवा प्रकाश चमकला तर ते संशयास्पद उपकरण असू शकते.
टॉर्च चालू करा आणि खोली पहाखोलीत प्रवेश केल्यावर काही वेळासाठी लाईट बंद करा, नंतर टॉर्च चालू करा आणि खोलीत प्रकाश दिसतो की नाही ते पहा. लपलेल्या कॅमेऱ्यांच्या लेन्समधून प्रकाश अनेकदा दिसतो. तसेच, टॉर्चने खोलीतील आरसे, एअर व्हेंट्स आणि कोपरे काळजीपूर्वक पाहा.
फोन कॅमेऱ्याने खोली चेक कराकाही लपलेले कॅमेरे रात्री पाहण्यासाठी इन्फ्रारेड (IR) प्रकाश वापरतात. ते शोधण्यासाठी तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याने अंधार असलेली खोली चेक करा. जर तुम्हाला काही चमक दिसली तर ती काळजीपूर्वक तपासा. तिथे कॅमेरा असू शकतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.