Womens World Cup Final : दीप्तिला आऊट देताना झाली मोठी चुक, रोहित शर्मा जाम भडकला, व्हिडीओ पाहिलात का?
Tv9 Marathi November 03, 2025 02:45 AM

IND Vs SA Final World Cup Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये हजर होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळाले. रोहित स्टेडियममधून भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्याचे काम करत होता. याच वेळी पंचाने चुकीचा निर्णय दिल्यानंतर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. त्याच्या याच नाराजीचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. दीप्ति शर्माला बाद घोषित केल्यानंतर रोहितने अशा नाखुशी व्यक्त केली.

दीप्तिला चुकीच्या पद्धतीने दिले बाद

सामन्याची 37 वे षटक चालू असताना दीप्ती शर्मा मैदानात फलंदाजी करत होती. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या नादीने डी क्लार्क हिला षटक टाकण्यासाठी चेंडू देण्यात आला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूत दीप्तीने जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू थेट दीप्तिच्या पॅडवर जाऊन लागला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी जोराची अपील करत दीप्ति एलबीडब्ल्यू बाद असल्याचा दावा केला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची आक्रमकता पाहून पंचाने दीप्तिला बाद असल्याचे सांगितले. दीप्तीने या निर्णयाशी असहमती दाखवत रिव्ह्यू घेतला. त्यानंतर रिव्ह्यूमध्ये दीप्ती बाद नसल्याचे स्पष्ट झाले..

रोहित शर्मा नाराज

या सर्व प्रक्रियेत रोहित शर्माचे हावभाव कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. दीप्तिला बाद दिल्यानंतर रोहित शर्माने नाखुशी व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरून त्याची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. रिव्ह्यूमध्ये पंचाचा निर्णय चुकीचा असल्याचे समजताच रोहित खुश झाला. त्याने टाळ्या वाजवून रिव्ह्यूमधील निर्णयाचे स्वागत केले.

rohit sharma reaction#Rohitsharma #WomensWorldCup2025 #WomensWorldCup #indwvssaw pic.twitter.com/RcEOZuwf8b

— Hitesh Jha (@HiteshjhaL58268)

भारताने केल्या एकूण 298 धावा

रोहितचे हेच हावभाव सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. रोहित शर्माचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सामन्यात स्मृती मंधानाने 45 धावा केलस्या. तर शैफाली वर्माने 78 चेंडूमध्ये 87 धावा केल्या. भारताने 50 षटकांमध्ये 298 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.