Kartiki Ekadashi Mahapuja : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा, मानाचे वारकरी दाम्पत्य कोण?
Sarkarnama November 03, 2025 02:45 AM
Kartiki Ekadashi Mahapuja

महापूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजा केली.

Kartiki Ekadashi Mahapuja वारकरी दाम्पत्य

नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या वारकरी दाम्पत्यालाही महापुजेचा मान मिळाला.

Kartiki Ekadashi Mahapuja शाळकरी मुलांनाही मान

यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापुजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.

Kartiki Ekadashi Mahapuja सन्मान

पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुळशीची माळ घालून आम्हाला सन्मानित करण्यात आले.

Kartiki Ekadashi Mahapuja शिंदे परिवार उपस्थित

या पूजेला एकनाथ शिंदे, पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते.

Kartiki Ekadashi Mahapuja चार पिढ्या पुजेला

माझ्या कुटुंबातील चार पिढ्यांना एकत्रपणे या पूजेमध्ये सहभागी होता आले हे मी माझे परम भाग्यच समजतो, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

Kartiki Ekadashi Mahapuja वालेगावकर दाम्पत्याचा सन्मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्य वालेगावकर यांचा सन्मान करण्यात आला.

विठुरायाला साकडे

पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला सुखी, समाधानी, आनंदी ठेव, त्यांच्यावरील सर्व संकटे दूर कर, असे साकडे एकनाथ शिंदेंनी विठुरायाच्या चरणी घातले.

NEXT : शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणारी वाघनखे; अंगावर शहारे आणणारी शस्त्र कशी दिसतात? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.