महाराष्ट्रात पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणुकांच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान तारखा लवकरच घोषित केल्या जातील.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यताराज्यातील नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका प्रथम घेतल्या जातील. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील. येत्या शुक्रवारपर्यंत, म्हणजे ७ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुका तीन टप्प्यात होणारसूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान पार पडेल. तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील.
Local Body Election: शिंदे-अजितदादा-फडणवीस विरोधात लढणार? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे टेन्शन वाढलं, महायुतीत अंतर्गत तणाव निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याची मुदतजिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान होण्याची शक्यता आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी मोठा अंदाज वर्तवलामाजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मोठा अंदाज वर्तवला आहे. ते म्हणाले, “नगरपरिषद निवडणुका सुरू असताना जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होईल. माझ्या माहितीनुसार, १५ डिसेंबरला जिल्हा परिषदेचे मतदान होईल. जिल्हा परिषद निवडणुका चालू असतानाच महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल आणि १५ जानेवारीला महापालिका मतदान होईल.”
वळसे पाटील यांनी ५ नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला. हा दिवस बुधवार असल्याने त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. प्रथम नगरपरिषद निवडणुका घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Local Body Election: निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही, ८ टर्म निवडून येणारे बाळासाहेब थोरात कसे पडले? ठाकरे बंधूंच्या मागण्या काय?