प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जिने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या निरागस अभिनयाने आणि रुपाने सर्वांच्याच मनात घर केलं. पहिल्याच चित्रपटात भरभरून यश मिळाल्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. जरीन खान तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. जरीनचे नाव आता एका अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. तिचं नाव ज्या अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे तो तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असल्याचं म्हटलं जात आहे.
जरीन खान पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामधील एका विषयामुळे चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेता तथा मॉडेल रोहीद खानसोबत तिचे नाव जोडले जात आहे. अभिनेता रोहीद खानसोबत तिचे नाते असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.अलिकडेच, जरीन आणि रोहीद एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले.
View this post on Instagram
A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)
दोघे एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले
तसेच याआधी देखील बऱ्याच ठिकाणी ते एकत्र दिसले आहेत. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता नुकतेच ते दोघे एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. त्यामुळे त्यांच्यातील नात्याच्या बातम्यांना अजून दुजोरा मिळाला. पण जेव्हा ही बातमी रोहीदपर्यंत पोहोचली तेव्हा त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की ते फक्त चांगले मित्र आहेत आणि कोणत्याही प्रेमसंबंधात नाही.
जरीनच्या कथित बॉयफ्रेंडने काय केला खुलासा?
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “आम्ही फक्त मित्र आहोत आणि त्या दिवशी जेवणासाठी भेटलो होतो.” जरीनने मात्र अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.जरीन आणि रोहीद यांनी अलीकडेच एकत्र दिवाळी साजरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर या अफवांना आणखी वेग आला. रोहीद हा 30 वर्षांचा ऑस्ट्रियन मॉडेल आहे आणि अलिकडेच तो ‘तेजस’ चित्रपटात दिसला होता.तर जरीन खान 38 वर्षांची असून ‘वीर’ या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात तिने केली होती. तसेच आता तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे.