आनंदी आणि उत्साही असलेल्या कुटुंबावर काधी कोणतं संकट येईल आणि सर्वकाही उद्ध्वस्त होईल काहीही सांगता येत नाही… आयुष्यात असे काही क्षण येतात ज्याचा आपण कधी विचार देखील करु शकत नाही. पण एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगळ कोसळला आहे. कारण अभिनेत्याने वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. तीन महिन्यांचं बाळ असताना अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे तर, कुटुंबावर देखील मोठं संकट आलं आहे.
अभिनेता धनंजय कोळी याचं रस्ते अपघातात निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षीय धनंजय याने आपले प्राण गमावले आहेत… मिळालेल्या माहितीनुसार, दोन ट्रकच्या मध्ये अडलेल्या कारमधील 5 जणांचं दुर्दैवी निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय याच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी गोंडळ बाळाला जन्म दिला आहे… धनंजय याचा अपघात झाला तेव्हा त्याचं बाळ आणि पत्नी लातूर येथे होती तर, आई – वडील पुण्यात होते. धनंजय व्यवसाय करत होता. पण अभिनयात असलेली स्वतःची आवड देखील जोपासत होता. धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आहे.
धनंजय याने काही नाटकांमध्ये भूमिका देखील बजावल्या आहे… तर इन्स्टाग्रामवर धनंजय याने स्वतःचा उल्लेख अभिनेता असा केला आहे. ‘या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला. तीन महिन्यांचा मुलगा वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला…’ अशी भावना धनंजय याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली…
अभिनेत्याची शेवटची पोस्ट..
सांगायचं झालं तर, धनंजय कोल्हापूरचा होता पण तो पुण्यात राहून स्वतःची नाटकांची आवडही जोपासत होता. काही दिवसांपूर्वी धनंजय याने पत्नीसोबत काही फोटो देखील पोस्ट केले होते. पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो त्याने पोस्ट केले होते… ती पोस्ट धनंजय याची अखेरची पोस्ट ठरली… आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार म्हणून अभिनेता आनंदी होता. पण बाळाच्या जन्माच्या तीन महिन्यांनंतर धनंजय याने अखेरचा श्वास घेतला…