देशात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकताच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेवर तिचा पती सतत अत्याचार करत होता. तिला दररोज कुणासोबत झोपायला सांगत होता. शेवटी त्या महिलेचा संयम सुटला. नंतर तिने जे काही केलं ते ऐकून सर्वजण थक्क झाले. पोलिसांच्या देखील पायाखालची जमीनच सरकली. आता नेमकं काय काय घडलं? चला जाणून घेऊया..
नेमकं काय घडलं?
ही घटना फतेहपुर कोतवाली परिसरातील मीरपुर गावातील आहे. येथे 18 नोव्हेंबरला सकाळी बड्डूपुर मार्गाच्या कडेला शेतकरी राजमल याचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीच्या तपासात हत्येचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आले नव्हते, ज्यामुळे हे प्रकरण सुटत नव्हते. पण पोलिसांच्या मॅन्युअल आणि डिजिटल तपासात धक्कादायक तथ्ये समोर आली. चौकशीत समजले की मृत राजमल हा दारूचा व्यसनी होता आणि नशेत पत्नी-मुलांना मारहाण करायचा. एवढेच नव्हे तर तो पत्नीवर पैशांसाठी दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकायचा. या सततच्या छळाला कंटाळून पत्नी आणि तिच्या 17 वर्षीय मुलाने हत्येची योजना आखली.
परिसरात खळबळ
17 नोव्हेंबरच्या रात्री राजमल आपल्या मोठ्या भावाच्या घरी ढोल-पूजन करून परतला आणि नंतर बाहेर पडला. त्याचवेळी पत्नी आणि मुलगा त्याच्या मागे निघाले. निर्जन जागी पोहोचताच दोघांनी त्याला ढकलून पाडले. नंतर मुलाने त्याचे हात पकडले आणि पत्नीने गळा दाबून त्याची हत्या केली. एसपी अर्पित विजयवर्गीय यांच्या मते, चौकशीत पत्नीने गुन्हा कबूल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि सततच्या छळाचे हे प्रकरण आता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
बायको आणि मुलाने राजमलची हत्या करुन त्याचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी टाकून दिले. त्यानंतर दोघेही घरी परतले. गावकऱ्यांनी मृतदेह पाहून पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशीमध्ये पत्नीने अतिशय धक्कादायक खुलासे केले. तसेच तिने राजमलच्या वाईट कृत्यांविषयी देखील सांगितले. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.