Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! वर्षभर 'या' मार्गावर प्रवेश बंद; काय असतील पर्यायी मार्ग?
esakal November 22, 2025 05:45 AM

नवी मुंबई : सिडकोच्या खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. १.७६३ किमी लांबीचा हा प्रकल्प करण्यात येत असून यामुळे खारघर, बेलापूर आणि तुर्भे दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. तसेच सध्या तुर्भे आणि खारघर दरम्यान प्रवासास ४० मिनिट लागत असूनलिंक रोडमुळे १० मिनिटांपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

सिडकोच्या खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पामुळे वाहनचालकांची गैरसोय होणार असल्याचे लक्षात घेता नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने एक वर्षाच्या कालावधीसाठी वाहतूक वळवण्याचा आराखडा तयार केला आहे. २० नोव्हेंबरपासून या प्रकल्पाचे काम सुरु झाले असून १६ नोव्हेंबरपर्यंत हे वाहतुकीत बदल लागू असणार आहेत. प्रकल्पाच्या कामादरम्यान, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग आखण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Asiatic Society Election: एशियाटिक निवडणुका २० डिसेंबरला? मतदार यादीवरुन पुन्हा वाद उफाळण्याचे चिन्ह

डीसीपी (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे वाहतूक युनिटच्या हद्दीत खारघर गुरुद्वारा ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत भूमिगत केटीएलआर प्रकल्पाचे बांधकाम २० नोव्हेंबर रोजी सुरू होईल. सायन-पनवेल महामार्गावरील शिरवणे पुलाच्या सुमारे १०० मीटर आधी बांधकाम सुरू केले जाईल.

या मार्गावर एकेरी वाहतूक सेवा

सायन-पनवेल महामार्गाच्या पुणे कॅरेजवेवरील सावन नॉलेज पार्क कंपनी ते शिरवणे एमआयडीसी ते डेल्टा स्टेलर कंपनीकडे जाणारा सेवा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल, ज्यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सरकारी वाहने यासारख्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग

उरण फाट्यावरून येणारी वाहने तुर्भे एमआयडीसी रस्त्यावर वळवली जातील. नेरुळहून अंतर्गत रस्त्यांनी येणारी वाहने सायन-पनवेल महामार्गावर वळवली जातील. तर, शिरवणे गावातून एमआयडीसीकडे येणारी वाहने प्रवेशद्वाराजवळील सुरू असलेल्या भूमिगत बोगद्याच्या कामाकडे जाणारी वाहने प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. शिरवणे गावातून येणारी वाहने जुईनगर रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोडकडे वळवली जातील. तर, शिरवणे गावातून नेरुळमधील एलपी ब्रिजकडे येणारी वाहने एलपी ब्रिज सर्व्हिस रोडकडे वळवली जातील. तसेच, नेरुळ आणि शिरवणे गावातून जाणारी वाहने सायन-पनवेल महामार्गाच्या मुंबई कॅरेजवेकडे वळवली जातील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.