अरे तु तर काळा आहेस तुला गोरा मुलगा कसा झाला असे मित्र मंडळी चिडवत होती. आपल्या मित्र मंडळीत हास्याचा विषय ठरलेल्या एका पतीचे डोके त्यामुळे भडकले. मित्रच काय तर शेजारीही टोमणे मारु लागण्याने चिडलेला हा बाप अखेर आपल्या सासुरवाडीला गेला आणि तेथे त्याने असा भयानक प्रकार केला की सारे गाव हादरले.
आपला रंग काळा ठीक्कर आणि मुलगा गोरा जन्माला आल्याने त्याला मित्रमंडळी चिडवू लागली. त्यामुळे त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. त्यातच शेजारीपाजरी देखील टोमणे मारु लागल्याने या बापाने थेट सासुरवाडी गाठली. त्यानंतर संशयांच्या भुंग्यामुळे त्याचा हातून एवढी मोठी चूक झाली की त्याला आता आयुष्यभर पश्चाताप होणार आहे.
ही धक्कादायक घटना बिहार येथील कटिहार जिल्ह्यातील अबादपुर ठाणे हद्दीतील नारायणपूर गावातील आहे. या घटनेनंतर या भागात खळबळ माजली. घटना स्थळी पोलिस दाखल झाली. त्यांना पती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार
आझमनगर पोलीस ठाणे हद्दीतील जलकी गावाचे रहिवासी सुकुमार दास यांच्या पत्नीला तीन महिन्यांपूर्वी मुलगा झाला. त्याच्या आधी त्याला आणखी एक मुलगा आहे. मात्र तो त्याच्या रंगाचा काळा सावळा होता. परंतू नुकताच झालेला दुसरा मुलगा गोरापान होता. गोऱ्यापान मुलाला पाहून सुकुमार याला त्याच्या पत्नीच्या चरित्रावर संशय येऊ लागला. त्यातच सुकुमार यांच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी आगीत तेल टाकण्याचे काम केले. तूर काळा आहेस आणि तुझा मुलगा गोरा कसा काय झाला ? असे त्याला टोमणे मारु लागले.
त्यानंतर त्याला वाटू लागले की हा आपला मुलगा नाही. सुकुमार दास याने त्याची पत्नी मौसमी दास हिच्याशी भांडायला सुरुवात केली.आणि तिला मुलाचा खरा बाप कोण सांग असे तो विचारु लागला. मौसमी त्याला समजावून सांगत होती की हा त्याचाच मुलगा आहे. परंतू सुकुमार याला काही त्यावर विश्वास वाटत नव्हता. पती-पत्नीत त्यावरुन खटके उडू लागले. त्यामुळे मौसमी तिच्या वडीलांना बोलावले आणि ती माहेरी गेली.
रक्ताचा सडा पडला होतासुमारे तीन महिने यावरुन दोघांत भांडणे होत होती. सुकुमार याच्या सासऱ्याने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. रात्री सर्वजण जेवून झोपण्यासाठी गेले. रात्री सुकुमार याने त्याची पत्नी मौसमी हीची गळा चिरुन हत्या केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरही अनेक वार केले. दुसऱ्या दिवशी कुटुंबिय जागे झाले तर मुलीची खोली उघडी होती. आतून मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. कुटुंबातील लोकांनी आत पाहिले तर त्यांना धक्का बसला. मुलीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर जावई फरार झाला होता. या प्रकरणात पोलिस फरार सुकुमारचा शोध घेत आहेत.