Parbhani Accident: मानवत तालुक्यात दुर्दैवी अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
esakal December 15, 2025 04:45 PM

मानवत : अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या तालुक्यातील रामेटाकळी येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रामेटाकळी येथील उद्धव भगवानराव कदम (वय-५०) हे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या शेतात दुचाकीवरून जात असताना लिंबाजी मुकदम यांचे शेताचे बाजूस नदी पुलाजवळ अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून उद्धव कदम यांना जोरात धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Amravati News: मेळघाट पुन्हा मातामृत्यूने हादरले; आठ दिवसांत दोन माता व चार बालकांचा मृत्यू

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरसिंह शिवाजीराव कदम यांच्या तक्रारीवरून मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.