Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण
Saam TV December 19, 2025 01:45 AM

Kranti Redkar: मराठी चित्रसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसी विषयी आणि जुळे अपत्यं होणार असल्याचं डॉक्टरने सांगितलं तेव्हा आलेल्या प्रतिक्रियेबद्दल खुलेपणाने बोललाी आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्रांती नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते आणि या वेळी तिने गर्भावस्थेतील ते खास क्षण सांगितले आहेत.

क्रांतीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला आधी फक्त एवढंच माहिती होतं की ती प्रेग्नेंट आहे. परंतु पहिल्यांदा सोनोग्राफी करताना डॉक्टरांनी तिला सांगितलं की तीला जुळे मुलं होणार आहेत आणि ते ऐकतानाच तिला धक्का बसला. डॉक्टरांनी जशी स्क्रीनवर पाहून तिला पहिल्यांदा सांगितलं हे बेबी वन आणि हे बेबी टू त्यावेळी क्रांती म्हणाली की, “माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मला वाटलं त्या चित्रपटात दाखवतात तसं सांगतिल पण त्यांनी खूप सहज पद्धतीने मला सांगितलं.

Shilpa Shetty: 420! अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल, प्रॉपर्टी होणार जप्त

क्रांती पुढे म्हणाली की, त्या वेळी मी आनंदीही होती कारण तिला मोठ्या काळानंतर मी आई होणार होते. तिने सांगितले, तिला वाटत होतं की सर्व काही व्यवस्थित झाले आणि करिअर पूर्ण झाल्यानंतर आता घर आणि कुटुंबावर लक्ष देण्याची वेळ आहे. मात्र जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला जुळे अपत्यं होणार आहे तेव्हा तिला एक वेगळाच आनंद झाला.

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?
View this post on Instagram

तिने आपल्या नवऱ्याशी समीर वानखेडे याबद्दलची प्रतिक्रिया देखील शेअर केली. तिने व्हिडिओ कॉलवर त्याला सोनोग्राफीबद्दल आणि जुळे होणार असल्याबद्दल सांगितलं असता समीरला आधी विश्वास बसला नाही, परंतु जेव्हा तो घरी आला, तेव्हा दोघांनी मिळून हा आनंद साजरा केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.