भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप 2026 (T20 worldcup 2026) साठी सर्वच उत्सुक आहे, यासाठी टीम इंडियाची (Team India) आजच (20 डिसेंबर) घोषणा होणार आहे. अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाील सिलेक्शन कमिटीची मुंबईत आज मीटिंग होणार असून त्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघनाची निवड होईल. गेल्या काही महिन्यांतील टीम इंडियाच्या टी-20 संघातील खेळाडूंकडे पाहता, निवड करणं तितकसं कठीण नसेल हे नक्की, पण कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म हाँ ध्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे त्याच्यावरच काही कारवाई होत नाही ना याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
ही बैठक आज मुंबईतील भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) मुख्यालयात होणार आहे, ज्यामध्ये पाचही सिलेक्टर्स उपस्थित असतील. सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील या मीटिंगचा भाग असू शकतो. या मीटिंगनंतर, मुख्य सिलेक्टर अजित आगरकर दुपारी 1:30 वाजता बोर्ड मुख्यालयात पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करतील. बीसीसीआयने शुक्रवारीच याची घोषणा केली आणि कर्णधार सूर्यकुमार यादव देखील पत्रकार परिषदेत सहभागी होणार असल्याचे नमूद केलं होतं.
सूर्यकुमार यादवबद्दल संभ्रम का ?
पण टी20 वर्लडकपासीठ भारतीय संघाच्या घोषणेच्या एक दिवस आधीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी-20 सामन्यात जे दृश्य दिसलं, त्यामुळे खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला टीम इंडिया कर्णधार म्हणून कायम ठेवू शकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अहमदाबादमधील अंतिम सामना भारताने 30 धावांनी जिंकला, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला, त्याने 7 बॉलमध्ये फक्त 5 धावा केल्या. संपूर्ण मालिकेत सूर्याला 4 डावात फक्त 34 धावा करता आल्या.
तसं पहायला गेलं तर सूर्यासाठी फक्त ही सीरिज नव्हे तर संपूर्ण वर्षच खराब गेलं. त्याने या वर्षी 21 डावांमध्ये 13.62 च्या सरासरीने आणि 123 च्या स्ट्राईक रेटने फक्त 218 धावा केल्या आहेत. त्यात त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्यामुळे, त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर सूर्यकुमार यादव टी20 वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून कायम राहिला, पण त्याचा फॉर्म तसाच असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून देखील वगळता येणार नाही, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. हे टीम इंडियासाठी घातक ठरू शकते.
सूर्या गमावणार कॅप्टन्सी ?
त्यामुळे सूर्याला कर्णधारदावरून हटवणारा का ? सिलेक्शन कमिटीच्या मीटिंगमध्ये एखादा धक्कादायक निर्णय होऊ शकतो का ? असे सवाल उपस्थित होत आहेत. एवढंच नव्हे तर हार्दिक पंड्याला पुन्हा संघाच्या कर्णधारपदाची धुरा मिळू शकते का ? कोच गौतम गंभीर आणि स्वतः आगरकर यांच्या विधानांचा आणि पद्धतींचा विचार केला तर हे शक्य नाही आणि विश्वचषकाच्या अगदी जवळ आल्यावर, गेल्या दीड वर्षापासून कर्णधारपद भूषवणाऱ्या सूर्यकुमार यादवला कायम ठेवले जाईल असंच चित्र दिसत आहे.
मात्र पीटीआयच्या एका रिपोर्टमध्ये आसा दावा करण्यात आला आहे की सूर्याची कॅप्टन्सी फक्त टी20 वर्ल्डकपपर्यंतच असेल, त्यानंतर त्याच्या जागी नवा कर्णाधार येऊ शकतो. त्याचं एक मोठं कारण म्हणजे सूर्याचा सध्याचा फॉर्म, तर दुसरं कारण म्हणजे त्याचं वाढतं वय. सध्या तो 35 वर्षांचा असून पुढल्या टी-20 वर्ल्डकपपर्यत तो 37 वर्षांचा होईल.
कोणाचा पत्ता होणार कट ?
जर बाकीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर सूर्याप्रमाणेच संघाचा उपकर्णधार शुभमन गिलही प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. या वर्षी त्याला एकही टी-20 समन्यात अर्धशतक झळकावता आले नाही. त्याच्यापायी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, तर यशस्वी जयस्वालला संघात स्थानही मिळू शकले नाही. तरीही, गिलला वगळण्याची शक्यता कमीच वाटते आणि यामुळे जयस्वालला बाहेर बसावे लागू शकते. त्याचप्रमाणे, नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराज सारख्या खेळाडूंनाही राखीव संघात स्थान मिळवावे लागू शकते.
टीम इंडियाचा संभाव्य संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.