मोठी बातमी ! अखेर शिवसेना-भाजपची युती तुटली, संपूर्ण राज्यात खळबळ
Tv9 Marathi December 29, 2025 04:45 AM

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. राजकीय पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. युती-आघाडीसाठीच्या बैठकांना वेग आला आहे. तर काही ठिकाणी जागावाटपांची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती केली आहे. मात्र इतर ठिकाणी हे दोन्ही पक्ष आपापल्या सोयीनुसार इतर पक्षांसोबत युतीत किंवा स्वतंत्र लढताना दिसत आहेत. अशातच आता अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली युतीची बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमरावतीत सेना-भाजपची युती तुटली

अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती, मात्र आता भाजप आणि शिवसेनेची युती तुटली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे संपर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेनेने भाजपकडे पंचवीस जागांची मागणी केली होती, मात्र हा प्रस्ताव भाजपने नाकारला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भाजप 87 पैकी 15 ते 16 जागा शिवसेनेला देण्यास तयारी होती अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकलेली नाही.

अमरावती महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सर्वच पक्ष व्यस्त आहेत. राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती आहे, मात्र अमरावतीत या दोन्ही पक्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मतांचे विभाजन झाल्यास दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ साडेपाच वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

2017 चा निकाल काय?

2017 च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. 45 जागा जिंकत भाजला बहुमत मिळाले होते, त्यामुळे चेतन गावंडे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली होती. 2017 साली काँग्रेसने 15, शिवसेनेने 7, असदुद्दीनं ओवैसी यांच्या एमआयएमने 10, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने 5, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे 3 जागांवर विजय मिळवला होता. तर आरपीआय आठवले गटाने एका जागेवर आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.