शिवसेनेकडून 40 च्या वर एबी फॉर्म वाटप
25 जागांवरती महायुती झाली तर शिवसेना लढू शकते
सामंत भाजप नेत्यांची चर्चा करणार
त्यामुळे शिवसेना महायुतीत जर गेली तर 25 ते 30 जागांवरती लढू शकते आणि वेगळी लढली तर 40 जागांवर ते शिवसेना उमेदवार उभे करणार
Ratnagiri: रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्विकारला पदभाररत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारला. ढोल-ताशांच्या गजरात नूतन नगराध्यक्ष सुर्वे यांनी नगरपरिषदेमध्ये प्रवेश केला. नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीचा आलेख चढता ठेवण्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज हे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच नागरिकांचे प्रश्न, सुविधा आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचे आश्वासन रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिले.
Pimpri Chichwad: पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्षाचा दिल्ली पॅटर्नआम आदमी पक्षाने घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. आम आदमी पक्षाने पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही पक्षाशी युती न करता जवळपास सर्व 128 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.
तसेच आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी स्वतः प्रभाग क्रमांक 26 मधून आपला महापालिका निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत रविराज काळे यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे.
आम आदमी पक्षासाठी आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची मत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दिल्लीच्या धरतीवर नागरिकांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, 20 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन अशी आश्वासन आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी या निवडणुकीत दिली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही धनशक्ती विरोधात जनशक्ती असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा निश्चितच विजय होईल तसेच महापालिकेवर आम आदमी पक्षाचाच महापौर बसेल असा विश्वास आम आणि पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त केला आहे.
Thane: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील युतीचा तिढा अखेर सुटलाठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकी मधील युतीचा तिढा अखेर सुटला आहे.131 जागांपैकी शिवसेनेला 87 जागा तर मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला 40 जागा देण्यात आल्या आहेत.तर मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी सेनेच्या अधिकृत उमेदवारांना अर्जाचे वाटप करण्यात आले. तर भाजपच्या वतीने देखील वर्तक नगर येथील कार्यालयात अर्जाचे वाटप करण्यात आले.आज सकाळी पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहेत.
पनवेल पालिका निवडणूक महाविकास आघाडीचे जागावाटपपनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पूर्णत्वास येत आहे. आघाडीतील पक्षांना खालीलप्रमाणे जागा देण्याबाबत एकमत झाले आहे.महाविकास आघाडी अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाला ३३ जागा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १९ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना ७ जागा देण्यात येणार आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाला १२ जागा, मनसेला २ जागा, समाजवादी पार्टीला १ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे.
अकोल्यात महायुती फिस्कटली; भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नाराअकोल्यातून मोठी बातमी.. अकोल्यात महायुती फिस्कटली आहेये.. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत युतीची घोषणा केलीय...तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय... महायुतीमधील जागावाटप फिस्कटल्याने अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.. काल रात्री उशिरापर्यत मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक पार पडली.. या बैठकीत शिवसेनेने हा 'ऐकला चलो रे'चा नारा दिलाय... त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणूकीत भाजप अन अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणारेये... तर शिवसेना पक्ष 80 जागांवर आपले उमेदवार देणारेये, अशी घोषणा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केलीए.. मात्र, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोजके काही तास राहिले, अशातही मंत्री संजय राठोड यांनी महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलेये.
अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा; 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी देणार उमेदवारअकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय.. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चेर्चेतून अखेर तिढा सुटलाये. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय.. 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवार देणारेये.. काही जागांवर भाजप मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याचे चित्र आहेये.. मात्र, शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिलाय
अकोल्यात शिंदेसेनेच्या सुरु बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी, कारण...भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती अकोल्यात जाहीर झाली खरी, मात्र ही युती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले.. आणि भाजपसोबत युती का केली?, याची भूमिका मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेच्या नेत्यांना समजावून सांगितली. अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत न घेतल्यामुळे शिंदे सेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ आलीय.. मूर्तिजापूर रोडवरच्या शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असलेल्या आरजी हॉटेलमध्ये इंद्रनील नाईक आणि मिटकरी यांनी मंत्री संजय राठोड आणि सेनेच्या नेत्यांची भेट घेतलीय. युती न झाल्यामुळे दुरावा नको म्हणून भेट घेतल्याचं मंत्री इंद्रनील नाईकांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, अकोल्यात भाजप 80 पैकी 66 जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवर लढणारेये.
अमित देशमुख यांच्या या भाषणानंतर लातूर मध्ये काँग्रेसची सहानुभूती वाढणार...महापालिकेच्या तोंडावर लातूर शहरात काँग्रेसला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळाल, माजी महापौर यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला , त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा ही, खऱ्या अर्थाने पणाला लागली आहे ,मात्र लातूरची संस्कृती ही, वेगळी आहे., इथे विकासाला आणि गुणवत्तेला मत दिलं जातं ,बंडखोरीला नाही. एखादा पक्ष बदलल्यानंतर राज्यात आणि देशात काय घडत ते आपण पाहतो. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला तरी लातूरची जनता ही विकासाच्या आणि गुणवत्तेच्या पाठीमागे उभी राहते. लातूरने जेव्हा-जेंव्हा लोकप्रतिनिधी निवडले तेंव्हा त्यांनी कधीही कर्तव्यात कसूर ठेवली नाही, हे लातूरच वेगळं वैशिष्ट्य असल्याच आ अमित देशमुख त्यांनी एका भाषणादरम्यान सांगितलं, तर त्यांच्या या भाषणामुळे गळती लागलेल्या काँग्रेसला लातूर मध्ये सहानुभूतीची चर्चा होताना दिसत आहे.