सातारा : येथील भिक्षेकरी गृहासमोर शुक्रवारी रात्री झालेल्या टेंपो आणि दुचाकीच्या अपघातात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारे आरे-दरे (ता. सातारा) येथील जवान प्रमोद परशराम जाधव (वय ३२) यांचा मृत्यू झाला. ते सध्या लडाख येथे कार्यरत होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते सुटीवर आले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी लष्करी इतमामात आरे-दरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Karad News: ऊस आंदोलन खटल्यानिमित्त दिसले ऋणानुबंध; शेतकरी संघटनेचे तीन नेते अनेक वर्षांनंतर एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा!आरे-दरे (ता. सातारा) येथील प्रमोद जाधव हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते गावी सुटीवर आले होते. त्यांच्या पत्नीस प्रसूतीसाठी एका रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून ते साताऱ्याकडे येत होते.
https://www.facebook.com/share/r/1NGGBknZAi/तेव्हा भिक्षेकरी गृहाजवळ त्यांच्या दुचाकीचा आणि समोरून आलेल्या टेंपोचा अपघात झाला. यामुळे ते फेकले गेले व पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आपटले. या अपघातात प्रमोद जाधव हे गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येत जखमी प्रमोद जाधव यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती प्रमोद जाधव यांना मृत घोषित करण्यात आले.
माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आरे-दरे ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. शनिवारी दुपारी प्रमोद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची प्राथमिक नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.