Satara Crime: गहाळ झालेले ५३ मोबाईल हस्तगत; सातारा शहर पोलिसांची कारवाई, नऊ लाख ६० हजारांचा मुद्देमाल मिळविण्यात यश!
esakal January 15, 2026 08:45 AM

सातारा: शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे नऊ लाख ६० हजार रुपये किमतीचे ५३ मोबाईल हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. नागरिकांचे हरविलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला सूचना दिल्या होत्या.

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

त्यानुसार या पथकाने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून राज्य व इतर राज्यात गेलेले संबंधित मोबाईलधारकांशी संपर्क करून नऊ लाख ६० हजार रुपये किमतीचे ५३ मोबाईल परत मिळविण्यात यश मिळवले आहे. हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात येणार आहेत.

जानेवारी २०२५ पासून शहर पोलिसांनी तब्बल २४४ गहाळ झालेले मोबाईल परत मिळवले आहेत. उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले,

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, तसेच सायबर पोलिस ठाण्याचे प्रशांत मोरे, रणजित कुंभार, ओमकार डुबल, यशवंत घाडगे व रामदास भास्करवाड हे या कारवाईत सहभागी होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.