2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं होतं. महापालिकेत भाजपानं एक हाती सत्ता मिळवली. मात्र यावेळी राजकीय समिकरणे बदललेली आहेत, त्यामुळे पुणे महापालिकेचा निकाल काय लागणार? याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 23 आणि 24 बद्दल बोलायचं झाल्यास पुण्याच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये एकूण चार वार्ड असून, यामध्ये हडपसर गावठाण आणि सातववाडी या भागाचा समावेश होतो. या प्रभागामध्ये गेल्या निवडणुकीत दोन जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या तर दोन जागांवर भाजपने विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये तीनच वार्ड आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये रामटेकडी आणि सय्यद नगर या भागांचा समावेश होतो. गेल्या वेळी यापैकी दोन वार्डात अपक्ष उमेदवार विजयी झाले होते, तर एका वार्डात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं विजयाचा गुलाला उधळला होता.
प्रभाग क्रमांक 23- पुण्याच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये हडपसर गावठाण आणि सातववाडी या भागाचा समावेश होतो. या प्रभागात एकूण चार वार्ड आहेत, गेल्यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागात चार पैकी दोन जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या, तर दोन जागा या भाजपला मिळाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 23 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार योगेश ससाणे हे विजयी झाले होते. तर ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली बनकर या विजयी झाल्या. क मधून भाजपच्या उमेदवार उज्वला जंगले या विजय झाल्या तर ड मधून भाजपचे उमेदवार मारूती तुपे यांनी बाजी मारली.
प्रभाग क्रमांक 24- पुण्याच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये एकूण तीनच वार्ड आहेत, त्यापैकी दोन वार्डात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. तर एका वार्डात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. प्रभाग क्रमांक 24 मध्ये रामटेकडी आणि सय्यद नगर या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 24 अ मध्ये अपक्ष उमेदवार अशोक कांबळे हे विजयी झाले तर ब मधून अपक्ष उमेदवार रुकसाना इनामदार यांचा विजय झाला, तर क मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद अलकुटे हे विजयी झाले होते.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE