Mahapalika Exit Poll : मुंबईसह सर्व 29 महापालिकेचा महानिकाल 'साम' टीव्हीवर : महाराष्ट्रातील सर्वात अचूक Exit Poll
Sarkarnama January 16, 2026 12:45 PM

Mahapalika Exit Poll : मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या धामधुमीनंतर मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) मतदान पार पडले. मतदारांनी दिलेला हा कौल आता मतपेटीत बंद झाला असून शुक्रवारी (16 जानेवारी) रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी साम टीव्हीवर महाराष्ट्रातील सर्वात अचून एक्झिट पोल प्रसिद्ध होत आहे. साम टीव्हीचा हा एक्झिट पोल सर्वात विश्वासार्ह मानला जातो. विधानसभा निवडणुकीवेळी केवळ साम टीव्हीचाच एक्झिट पोल अचूक ठरला होता.

मुंबई महापालिकेमध्ये कोणाची सत्ता?

मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी एकत्र येत बलाढ्य भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. मागील 3 दशकांपासून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती. मात्र ही सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने प्रचंड जोर लावला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.