swt159.jpg
17978
श्री गणेश
खवणे येथे बुधवारपासून
माघी गणेश जयंती उत्सव
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १५ः माघी गणेश जयंती उत्सव निमित्ताने खवणे येथे २१ ते २६ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. यानिमित्त २१ ला ढोलताशांच्या गजरात श्री गणेश आगमन सोहळा, २२ ला सकाळी ८ वाजता श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा, ९ वाजता अभिषेक, आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता नामस्मरण, ५ वाजता दर्यावर्दी वारकरी भजन मंडळ खवणे यांचे भजन, ६ वाजता सत्षुरुष भजन मंडळ खवणे यांचे भजन, ७ वाजता भजन, रात्री ८.३० वाजता संकल्पपूर्ती कृतज्ञता समारंभ, ९ वाजता ओमी डान्स ग्रुप वेंगुर्ले प्रस्तुत ''कलारंग नटरंग'', २३ ला दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता संगीत खुर्ची, ६ वाजता सुश्राव्य भजने, रात्री ८ वाजता श्री ब्राह्मण प्राज्ञा, दांडिया गृप कुर्लेवाडी उभादांडा, ९ वाजता वैभवी क्रिएशन डिचोली गोवा, निर्मित दोन अंकी विनोदी नाटक, २४ ला दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता मोरेश्वर फुगडी मंडळ नेरुर वाघचौडी यांचे नृत्य, हळदीकुंकू, ६ वाजता भजने, रात्री ८ वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा, ९ वाजता ''बिट्स डान्सर'' ही खुली सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा (प्रथम १० हजार, द्वितीय क्रमांक ७०००, तृतीय क्रमांक ५०००, चतुर्थी ३०००, उत्तेजनार्थ १००० रुपये), २५ ला दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, ७ वाजता भजन, रात्री ८ वाजता लकी ड्रॉ निकाल व आभार प्रदर्शन, १० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक, २६ ला पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता उत्तरपूजा, ६ वाजता श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माघी गणेश जयंती उत्सव मंडळ खवणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.