NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाला दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 33, प्रभाग क्रमांक 34 आणि प्रभाग क्रमांक 35 मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपुरात सध्याची स्थिती काय आहे?नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.
सध्याचे जागावाटप कसे आहे?नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.
2017 साली प्रभाग क्रमांक 33 मध्ये कोणाचा विजय?प्रभाग क्रमांक 33 अ- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- वंदना भगत
प्रभाग क्रमांक 33 ब- पक्ष- भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- भारती बुंदे
प्रभाग क्रमांक 33 क- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- विशाखा बांटे
प्रभाग क्रमांक 33 ड- पक्ष-काँग्रेस-विजयी उमेदवाराचे नाव- मनोजकुमार गवंडे
2017 साली प्रभाग क्रमांक 34 मध्ये कोणाचा विजय झाला?प्रभाग क्रमांक 34 अ- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- मंगेश मानकर
प्रभाग क्रमांक 34 ब- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- राजेंद्र सोनकुसरे
प्रभाग क्रमांक 34 क- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- माधुरी ठाकरे
प्रभाग क्रमांक 34 ड- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- मंगला खाखरे
2017 साली प्रभाग क्रमांक 35 मध्ये कोणाचा विजय झाला?प्रभाग क्रमांक 35 अ- पक्ष भाजपा- -विजयी उमेदवाराचे नाव- निलेश कुंभारे
प्रभाग क्रमांक 35 ब- पक्ष- भाजपा -विजयी उमेदवाराचे नाव- जयश्री वादीभस्मे
प्रभाग क्रमांक 35 क- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- विशाखा मोहड
प्रभाग क्रमांक 35 ड- पक्ष- भाजपा- विजयी उमेदवाराचे नाव- अविनाश ठाकरे
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
नागपूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE