Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन
Saam TV January 24, 2026 05:45 AM
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी येत्या 25 जानेवारी रोजी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनावर उमेदवारांकडून तीव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांची निवड, प्रचंड भौगोलिक अंतर, अपुऱ्या सुविधा आणि पारदर्शकतेअभावी ही परीक्षा अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्य गेटसमोर आंदोलन केले.या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क भरून सुमारे 42 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, हॉल तिकीट प्राप्त झाल्यानंतर अनेक उमेदवारांना घरापासून 400 ते 500 किलोमीटर दूर असलेली खासगी परीक्षा केंद्र दिल्याचे उघड झाले आहे.

सांगोल्यात अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील वाकी येथे इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या मुलीला भरधाव ट्रकक्टरने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये तीचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात नंतर येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर येवून आंदोलन केले.

सांगोला अकलूज महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. वाकी येथे आज सकाळी शाळेतून घरी जाणार्या ऋतुजा धनाजी कोकरे या शाळकरी मुलीला ट्रॅक्टरने धडक दिली.

या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे काम संत गतीने सुरू असल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावी अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

अवघ्या 150 रुपयात पार पडलं माजी आमदार कन्येचं लग्न; लग्नाचा खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांना करणार मदत

सध्या शाही विवाह करण्याचा एक प्रघात सुरु आहे.त्यासाठी लाखो करोडो रुपयांचा चुराडा होतो.मात्र या सर्व बडेजावपणाला फाटा देत अवघ्या 150 रुपयात माजी आमदार कन्येचा विवाह सोलापुरात पार पडला आहे.माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा हिचा विवाह शुभम शिंदे या तरुणांशी नोंदणीकृत पद्धतीने पार पडला आहे.शुभम शिंदे हा पाणी पुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे.तर सुषमाने नुकताच भारती विद्यापीठ पुणे येथून एमएससी इन ह्यूमन ॲनाटोमीच शिक्षण घेतल आहे.दोन्ही नवविवाहित वधूवर हे उच्च विद्या विभूषित आहेत.सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला.या साध्या विवाहला दोन्ही परिवारातील निवडक नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होते.दरम्यान या विवाहचा खर्च टाळून साधारण 25 ते 30 लाख रुपये हे विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दांपत्याने घेतला आहे.'सावंत-शिंदे' परिवाराने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Badlapur Case: बदलापुरातील अत्याचार प्रकरणी बाल हक्क आयोगाच्या सचिवांची शिक्षण विभाग आणि पोलिसांसोबत बैठक

बदलापुरात चार वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज बाल हक्क आयोगाच्या सचिवांनी पोलीस आणि शिक्षण विभागसोबत बदलापूरात येऊन आढावा बैठक घेतली. ही घटना एका प्री स्कूलमध्ये घडली असून कोणतंही प्री स्कूल शासनाच्या अखत्यारीत येत नसल्याचं बाल हक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी सांगितलं. या घटनेबाबत आम्ही शासनास अहवाल देणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. बदलापूर शहरात 10 अनधिकृत शाळा असून त्यातील तीन शाळा बंद केल्या असल्याचं गटशिक्षण अधिकारी यांनी सांगितलंय. मात्र कोणतीही प्री स्कूल हे शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येत नसल्यानं प्री स्कूलबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता या प्री स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बदलापूर शहरात अनेक विद्यार्थी हे प्री स्कूलमध्ये शिकत असून या प्री स्कूल शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आणाव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या संगीता चांदवणकर यांनी सांगितलंय.

Dhule: धुळे महानगरपालिकेवर महिलाराज

धुळे महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा महिला राज आपल्याला बघावयास मिळणार आहे, कारण धुळे महानगरपालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण महापौर पदासाठी जाहीर झाल आहे, आणि धुळे महानगरपालिकेच्या 74 नगरसेवकांच्या पदासाठी जवळपास 41 महिला या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत, त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या लक्षवेधी ठरली आहे,

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या भावाला दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

महिलेचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह त्यांच्या इतर दोन समर्थकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणातील काआरोपी राहुल बबन झावरे, संदीप लक्ष्मण चौधरी आणि निलेश लंके यांचे बंधू दीपक ज्ञानदेव लंके यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामिनाचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपींना दोन आठवड्यांच्या आत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Beed: बीडच्या नाथापूर मध्ये दोन गटात दगडफेक आणि हाणामारी

बीडच्या नाथापुरमध्ये रात्री उशिरा जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले होते. यामध्ये एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणी दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

Pune: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला 26 जानेवारीला सुट्टी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला 26 जानेवारीला सुट्टी

प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व बाजार बंद राहणार आहेत

मोशी,उत्तमनगर,मांजरी,खडकी उपबाजार राहणार बंद

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पश्चिम महाराष्ट्र सह राज्यातील विविध भागातून भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो.

Pune Mayor: तारीख ठरली! या दिवशी ठरणार पुण्याचा महापौर

३० किंवा ३१ जानेवारी रोजी मिळणार पुण्याला महापौर

पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी यंदा सर्व साधारण महिला आरक्षण

पुणे महापालिकेसाठी दहावी महिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष

असा असणार पुणे महापालिका महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम

बदलापूर अत्याचार प्रकरणी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

बदलापूर अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतलीय. या प्रकरणी खाजगी शाळा आणि खाजगी व्हॅन दोन्हींची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी केलीय.

Navi Mumbai: नवी मुंबईत सागर नाईक यांची भाजपच्या गटनेते पदी नियुक्ती

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता सागर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तसेच भाजपकडे 66 इतके संख्याबळ झाल्या असून भाजपच्या गटनेते सागर नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच भाजपकडून कोकण भवन येथे गट स्थापन करण्यात येत आहे तसेच अपक्ष यांनी एक पाठिंबा भाजपला दिला आहे

Pandharpur: विठुरायाची रंगपंचमी आजपासून सुरू

आज वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पंढरपूर मध्ये संपन्न होत असतानाच वसंत पंचमीचे रंगपंचमी पर्यंत विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला आहे आज पासून देवाची रंगपंचमी सुरू झाली आहे ती रंगपंचमी पर्यंत सुरू राहणार आहे आज विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता डोक्यावरती पगडी त्यावरती मोरपंख अशा पद्धतीचा पोशाख परिधान करण्यात आला होता आज विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये देवाच्या अंगावरती गुलाल टाकून वसंत पंचमी साजरी करण्यात आले आहे

Thane: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केली गटस्थापना

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांची ठामपा गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले.

नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचे पत्र दिले. ठाणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे.

Nashik Mayor: नाशिक महापालिकेत एकीकडे भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच, शिंदे गटात मात्र संभ्रम

नाशिक महापालिकेत एकीकडे भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेत मात्र संभ्रम कायम

भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधी बाकावर बसायचं? यावर अद्याप निर्णय नाही

यासंदर्भात एकनाथ शिंदेचं अंतिम निर्णय घेतील, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांची माहिती

येत्या २ ते ३ दिवसात आम्ही गट नोंदणी करणार आहोत, काही तांत्रिक मुद्द्यांमुळे गटाची नोंद करण्यासाठी झाला उशीर, अजय बोरस्ते यांची माहिती

Latur: लातूरमध्ये महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागणार?

लातूर महानगरपालिकेतील महापौर पद हे SC एसी महिलेसाठी राखीव सोडण्यात आल आहे, तर महानगरपालिकेवर महापौर पदासाठी काँग्रेसकडून 3 महिला उमेदवारांची नावे समोर येताना पाहायला मिळत आहेत., कांचन अजनीकर, मनीषा बसपुरे, जयश्री सोनकांबळे या महिला उमेदवारांची नावे सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे, मात्र यापैकी कुणाची वर्णी महापौर पदासाठी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले..

Malshiras: माळशिरसमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आरपीआयची युती तुटली...

माळशिरस मध्ये भाजपला मोठा धक्का...

माळशिरस तालुक्यात भाजप आरपीआयची(आठवले गट) युती तुटली...

भाजपने आरपीआयला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकही जागा न दिल्याने आरपीआय ने महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला...

आरपीआय महाविकास आघाडी सोबत...

आरपीआयला वेळापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरसचे अध्यक्ष मिलिंद सरतापे यांची माहिती...

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींची आज होणार निवड...

नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या विशेष समितीच्या सभापतींची आज निवड होणार असल्याने चारीपालिकेंमध्ये विशेष सभा घेतल्या जाणार आहेत. पालिका निवडणुकीनंतर उपनगराध्यक्षची निवड झाली त्यानंतर आता विशेष समित्यांचे सभापतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विशेष समितीच्या सभापतीची निवड झाल्यानंतर पालिकेच्या कामकाज सुरळीतपणे सुरू होणार आहे. मात्र सभापती पद मिळावं यासाठी गेल्या काही दिवसापासून राजकीय हालचाली सुरू होत्या, त्यामुळे विशेष समितीच्या सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहेत तर दुसरीकडे शहादा तालुक्यात भाजपाचे सर्वाधिक वीस नगरसेवक असल्याने विशेष समितीचे सभापती पद कोणाच्या गोठ्यात जाणार हे पहाणे महत्त्वाचे आहे. शहादापालिकेत जनता विकासाकडे चे नगराध्यक्ष तर भाजपाचे सर्वाधिक वीस नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे सर्वाधिक चुरस शहादा पालिकेत पाहायला मिळवून येणार आहे.

Raigad: महाड नगर परिषद राडा प्रकरण, विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण

रायगड -

महाड नगर परिषद राडा प्रकरण

विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर

विकास गोगावले स्वतःहून पोलिसांसमोर हजर होणार असल्याची सूत्रांची माहिती

महाड पोलिस ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्त

Nashik: नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा

नाशिक -

- नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा

- नाशिक महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला होणार आहे विराजमान

- 26 वर्षानी नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी झालंय राखीव

- महापौर पदाच्या खुर्चीसाठी 16 महिलांची नावे आहेत चर्चेत

- हिमगौरी आडके, दिपाली गीते, संध्या कुलकर्णी, डॉक्टर योगिता हिरे आणि डॉक्टर दिपाली कुलकर्णी यांच्यामध्ये विशेष स्पर्धा

- उच्च शिक्षित आणि चांगला उमेदवार महापौर पदासाठी देऊ, गिरीश महाजन यांचे देखील सुचक वक्तव्य

- नाशिक महापालिकेत भाजपाला मिळालीय एकहाती सत्ता

- त्यामुळे नाशिकच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार, याकडे लक्ष

Nashik: सूर्यकिरण शोसाठी तिकिट आकारणी केल्यानं हवाई दल नाराज

नाशिक -

- सूर्यकिरण शोसाठी तिकिट आकारणी केल्यानं हवाई दल नाराज

- एअर फोर्स ने ट्विट करता नाराजी व्यक्त केली

- देशभवना निर्माण करणे, युवकांना प्रेरणा देण्यासाठी वायू दल एअर शो घेत असते कोणताही शुल्क आकारले जात नाही

- जमा होणारा निधी सैनिक कल्याणासाठी दिला जाणार असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा

Pune: देशात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी पुण्याचा दुसरा क्रमांक

पुणे -

देशात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी पुण्याचा दुसरा क्रमांक

टॉम टॉम या संस्थेने केलेल्या अभ्यासातून माहिती आली समोर

वाहतूक कोंडीची समस्या दूर करणे, नव्या कारभारी यांच्यापुढे आव्हान

पुण्यात वाहनचालकांना १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतात ३३ मिन २० सेकंद, टॉम टॉम संस्थेचा अहवाल

गर्दीच्या वेळेत शहरात वाहनांचा वेग १५.१ प्रतितास असल्याचा या संस्थेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट

देश पातळीवर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेली शहरं

Beed: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

बीड:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार.

हत्या प्रकरणातील साक्षीदारांची यादी सरकारी वकील न्यायालयाकडे देणार आहेत.

न्यायालयाकडून साक्षीदारांना आज नोटीस इशू होतील आणि नंतर प्रत्यक्षात साक्षीदार हजर राहतील.

त्याचबरोबर या प्रकरणातील फिर्यादी यांना देखील नोटीस इशू करण्यात येणार आहे.

Solapur: सोलापूर महापालिकेतील महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्ष कार्यालय प्रशासनाकडून करण्यात आले सज्ज

सोलापूर -

- सोलापूर महापालिकेतील महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्ष कार्यालय प्रशासनाकडून करण्यात आले सज्ज

- सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी सुटलं आहे.

- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळाले आहे पूर्ण बहुमत..

- दरम्यान,पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत येत्या आठवड्यात महापौर निवडी होण्याची शक्यता

- मनपा आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडून कॉन्सील हॉल आणि कार्यालयांची करण्यात आली पहाणी

- सोलापूर महानगरपालिकेच्या नवीन नगरसेवकांचा पुढच्या आठवड्यात शपथविधी होण्याची शक्यता.

Dharashiv: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र

धाराशिव -

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम विरोधातील उपोषणाला भेट दिल्यानंतर, रस्त्यावर जाळपोळ आणि बसची तोडफोड

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा गंभीर आरोप

आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे ईव्हीएम विरोधात आमरण उपोषण सुरू

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान कडून उपोषण, उपोषणाची दखल न घेतल्याने टायर पेटवत निषेध

तर काल धाराशिव बस डेपोमध्ये दुचाकी वर येत बसची तोडफोड

धाराशिवमध्ये बस तोडफोड करणारे तीन आरोपी अटकेत; नांदेड आणि बीड जिल्ह्यातील आरोपी असल्याची माहिती

Byte: नितीन काळे,माजी जिल्हाध्यक्ष भाजप

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या 168 जागांसाठी 633 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या 168 जागांसाठी 633 उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद साठी 202 तर, पंचायत समिती साठी 431 अर्ज ठरले वैध

आता प्रतीक्षा माघारीची

तीन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

Ratnagiri: गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार नंदुरबार येथे ध्वजारोहण

रत्नागिरी - गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार नंदुरबार येथील ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले परिपत्रक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार येथील प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान दिला योगेश कदम यांना

मंत्री झाल्यानंतर योगेश कदम प्रथमच करणार शासकीय ध्वजारोहण

Nagpur: महापालिका निवडणुकीत भाजपानंतर काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर

नागपूर -

- महापालिका निवडणुकीत भाजपानंतर काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

- काँग्रेसला एकूण ३४ नगरसेवक निवडून आले आहेत.

- त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे

- पक्षाकडून अनुभवी, आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवकाचा विचार केला जात आहे.

- विरोधी पक्षनेत्यामध्ये प्रशासनावर पकड असणे आवश्यक मानले जात आहे या निकषांवर पक्षात अनेक नावे चर्चेत आहेत

- शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Nagpur: नागपूरसह विदर्भातील ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत नागपूर खंडपीठाने व्यक्त केली चिंता

नागपूर -

- नागपूरसह विदर्भातील ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत नागपूर खंडपीठाने व्यक्त केली चिंता

- विदर्भातील ध्वनी प्रदूषणासंदर्भात न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतलेली आहे

- विदर्भात ध्वनी प्रदूषणाची समस्या भेडसावत असल्याचं निरीक्षण नोंदवत याचिकेचा विस्तार केला

- विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी, पोलीस आयुक्त,पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावत दोन आठवड्यात जबाब नोंदविण्याचे दिले निर्देश

- धार्मिक, सामाजिक कार्यात ध्वनीक्षकांचा मोठा वापर होत असून यामुळे ध्वनी प्रदूषण वाढत असल्याची टीका

Jalgaon: जळगावच्या पाळधी गावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण

जळगाव -

जळगावच्या पाळधी गावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चालते फिरते नेत्रालय असलेल्या रुग्णवाहिकेच लोकार्पण

जळगाव ग्रामीण मतदार संघ मोतीबिंदू मुक्त करण्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवला संकल्प....

यावेळी पाळधी सह मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद, सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद, सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च

कोरोना काळात उभारले होते हे ऑक्सिजन प्लांट;दिवसाला 13,36 मॅट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता..

ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यासाठी टेक्निशन आणि मनुष्यबळ न मिळाल्याने प्लांट बनले शोभेची वस्तू.

पाच वर्षापासून एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला नाही... कोरोना काळात उभारण्यात आले होते हे ऑक्सिजन प्लांट...

Pune: पुण्यात फ्लेक्स कारवाईसाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथक

पुणे -

पुण्यात फ्लेक्स कारवाईसाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथक

शहरातील अनधिकृत प्लेक्स आणि बॅनर्सवर कारवाई तीव्र करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक

नवीन आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती

अर्थसंकल्पात फ्लेक्स काढण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयात २ ते ३ कर्मचारी नियुक्त करणे, गाडीची व्यवस्था करणे यासाठी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार

शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी

भाजपने तर जाहीरनाम्यातच पुणे फ्लेक्समुक्त व अतिक्रमणमुक्त करू असे आश्वासन दिले आहे

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तर फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिकेत पद देण्यापासून दूर ठेवले जाईल असा इशारा दिला आहे

Ratnagiri: रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्षांना इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी

रत्नागिरी -

रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्ष असलेल्या समीर तिवरेकर यांना नगरपरिषदेच्या इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल

नगरपरिषदेचे इंजिनियर असलेल्या यतीराज जाधव यांच्याकडून तिवरेकर यांना शिवीगाळ

नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय काळात 4 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा तिवरेकर यांचा आरोप

भाजपचे उपनगराध्यक्ष असलेल्या तिवरेकर यांच्याकडून नगरपरिषदेतील शौचालय घोटाळ्याचा पाठपुरावा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.