राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, अवकाळी पावसासोबत…
Tv9 Marathi January 24, 2026 05:45 AM

हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. 1 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यातील गारठा कमी झाला. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ज्यामुळे तापमान वाढत आहे. देशातून मॉन्सून जाऊन काही महिने झाली आहेत. मात्र, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. देशातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा दिला. सतत वातावरणात बदल होत असल्याने त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.

पुण्यात थंडी ओसरली असून उकाड्यात वाढ झाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट होऊन गारठा वाढला होता. मात्र, गेल्या दोन दिवसात किमान तापमान साधारण तीन अंश सेल्सिअसची वाढ तर कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. परिणामी शहरातील थंडी ओसरली असून, उकाड्यात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कडाक्याची थंडी होती.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला तरी राज्यातून थंडी गायब झाल्याचे स्पष्ट आहे. पूर्वी राज्यातील पारा 5-6 अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असेल. यासोबतच अवकाळी पाऊसही हजेरी लावू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवसात हवामानात काही बदल होतील. मात्र, जानेवारी महिना संपायला काही दिवस शिल्लक असताना राज्यात पाऊस होताना दिसतोय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.