ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2026 | गुरुवार
गणेश लटके January 29, 2026 08:43 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2026 | गुरुवार

1) अजितदादा अमर रहे अमर रहेच्या घोषणा आणि डोळ्यांत अश्रू, अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://tinyurl.com/53r9vpp5 अजित पवार यांचा निपचित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार, महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारे चित्र https://tinyurl.com/58bejyhk

2) अजित पवार यांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरु; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडूंनी फडणवीस यांना पत्र लिहित दिली माहिती https://tinyurl.com/4zkfn6s8

3) अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं, मंत्री नरहरी झिरवळ यांची मागणी https://tinyurl.com/dzdtz8sf  अजितदादांचा राजकीय वारसा सुनेत्रा ताई पुढे नेतील, आम्ही त्यांना ताकद देऊ, बारामतीकरांनी व्यक्त केल्या भावना https://tinyurl.com/36fzs37w

4) आता सत्य बोलणं गरजेचं, महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार म्हणाले होते, आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल, शशिकांत शिंदे यांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/nhcmnvwx  12 डिसेंबरला दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचं गिफ्ट पवारसाहेबांना देण्याचं अजित पवारांच्या मनात होतं, अंकुश काकडे यांनी सांगितली अजित पवार यांच्यासोबत झालेली चर्चा https://tinyurl.com/36y9n5pb

5)  मला सगळ्याचा कंटाळा आलाय, आता बस्सं वाटतंय'; मृत्यूच्या पाच दिवस आधीच अजित पवारांनी जवळचे सहकारी किरण गुजर यांच्याकडे बोलून दाखवली होती भावना https://tinyurl.com/2nadfprs
रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ म्हणालो; पण दादांनी ऐकलं नाही, गाडीचे चालक श्यामराव मनवेंनी सांगितला आदल्या दिवशीचा घटनाक्रम, सर्वस्व गमावल्याची व्यक्त केली भावना https://tinyurl.com/4vkxkef2

6) अजितदादांची आई टीव्ही पाहत होती, अचानक बातमी आली, टिव्हीची केबल तोडली गेली, फोन फ्लाईट मोडवर, फार्म हाऊसवर मन सुन्न करणारा प्रसंग https://tinyurl.com/yn5yxubn अजित पवारांना सावलीसारखी साथ देणारे सुरक्षारक्षकांना अश्रू अनावर, जय पवारांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडले https://tinyurl.com/5xbzmtbr

7) सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला, मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, बारामतीत लँडिंगआधी काय घडलं? सरकारच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर https://tinyurl.com/5748m48y  अहमदाबाद विमान अपघातात ज्या 11 नंबरनं जीवनदान दिलं, तोच 11 नंबर बारामती अपघातात मात्र दुर्दैवी ठरला; अजित पवारांच्या विमान अपघातात शेवटच्या 3 मिनटांत काय घडलं? https://tinyurl.com/w2ed5n5b 

8) विमानाचं शेवटचं टोक फक्त दिसतंय, बाकी सगळं जळून खाक झालंय, अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात आधी राजेश टोपेंना मिळाली https://tinyurl.com/msrhe2k7  मी देवगिरीवर गेलो, दादांची चप्पल चोरून आणली आणि त्याची पूजा माझ्या घरात केली, खास किस्सा सांगताना अमोल मिटकरींना अश्रू अनावर https://tinyurl.com/34unzsnh ना सभागृह, ना आमचं आयुष्य, आधीसारखं काहीच नसणार; अजितदादांच्या आठवणी सांगत आदिती तटकरे हमसून हसमून रडल्या https://tinyurl.com/3sh5v9m3

9) भाजपने अजितदादांवरील 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावेत, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/yc3a4ys2

10) दादाच नाहीत, मला फोन करुन आत कोण घेणार? गायक आनंद शिंदे अंत्यसंस्काराला आले आणि बाहेरूनच परतले https://tinyurl.com/bdeaasjs आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतंय, अजितदादांच्या आठवणीनं  मराठी अभिनेता संकर्षण कराडे भावूक https://tinyurl.com/4vf925sp 
अजितदादांच्या लाडक्या सूरजला अंत्यदर्शन मिळालं नाही, सूरजने काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ केला शेअर https://tinyurl.com/mpcrf4k6

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

 

 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.