राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे सध्या कडाक्याची थंडी आहे. मात्र, राज्यातील थंडी गायब झाली. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यात अवकाळी पाऊस झाला. तेव्हापासून थंडी गायब झाली. डिसेंबर महिन्याप्रमाणेच जानेवारीतही थंडी राहण्याची शक्यता होती. आता फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून तापमानात चढउतार राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात सध्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली या भागात पाऊस बघायला मिळतोय. मुंबई आणि दिल्लीतील वायू प्रदूषण मोठा मुद्दा बनले आहे. मुंबईमध्ये सातत्याने प्रदूषणात वाढ होत आहे. दिवसा हवेत धुळेचे कण दिसत होते. वाढलेल्या वायू प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहण्याची अंदाज आहे. राज्यात ढगाळ वातावरण सध्या बघायला मिळत आहे. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ उतार सातत्याने बघायला मिळतोय. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज दिवसभर राज्यात धूसर वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यातून थंडी जवळपास गेली आहे.
फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरणासह राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. जानेवारीप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यातही वातावरणात मोठे बदल दिसतील. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असली तरीही राज्यात येणाऱ्या शीतलही कमी असल्याने थंडी फार काही नाहीये. सुरूवातीला सांगितले जात होते की, जानेवारी महिन्यातही राज्यात थंडी कायम राहिल. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.
सतत हवामानातील बदल आणि त्यामध्येच वाढलेले वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाशी संबंधित आजार निर्माण होत आहेत. यासोबतच सर्दी, खोकला आणि ताप यांच्याही रूग्णात मोठी वाढ होत आहे. याकाळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.