एअरटेलने त्यांच्या कोट्यवधी युझर्सना दिलेले एक प्रीमियम फ्री गिफ्ट आता अचानक काढून घेतले आहे. एअरटेलने काही काळापूर्वी आपल्या निवडक प्लॅन्ससोबत Perplexity Pro या अॅडवांस AI चे मोफत सबस्क्रिप्शन जाहीर केले होते. मात्र आता कंपनीने ही ऑफर अधिकृतपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून नवीन युझर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. या निर्णयामुळे प्रीमियम डिजिटल सेवांचा मोफत आनंद घेणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
Perplexity Pro हे केवळ साधे सर्च इंजिन नसून ते एक शक्तिशाली AI साधन आहे, जे गुंतागुंतीच्या प्रश्नांची अचूक आणि संदर्भासहित उत्तरे देते. साधारणपणे या सेवेसाठी महिन्याला सुमारे १६०० ते २००० रुपये मोजावे लागतात. एअरटेलने आपल्या थँक्स ॲप (Airtel Thanks App) द्वारे ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिली होती जे तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक मोठे आकर्षण ठरले होते. मात्र आता ही ऑफर प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आली आहे. (Airtel discontinues Perplexity Pro offer)
Sun Blasts : सूर्यावर हे काय सुरुय? 24 तासांपेक्षा कमी वेळात 17 मोठे स्फोट; बॅड मूडमागचं कारण आलं समोर, आपल्यावर कसा परिणाम होणार, पाहाज्या युझर्सनी ही ऑफर आधीच क्लेम केली आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. एअरटेलने स्पष्ट केले आहे की ज्यांनी सबस्क्रिप्शन आधीच सक्रिय केले आहे, ते त्यांच्या ठराविक कालावधीपर्यंत (उदा. १ वर्ष) या सेवेचा वापर विनामूल्य सुरू ठेवू शकतील. केवळ नवीन युझर्स किंवा ज्यांनी आतापर्यंत ही ऑफर रिडीम केली नव्हती, त्यांना आता यापुढे ती क्लेम करता येणार नाही. (Airtel Thanks App offers)
Instagram News : इंस्टाग्राम गुपचुप ऐकतंय तुमचं बोलणं? बंद करा 'ही' 1 सेटिंग नाहीतर होईल नुकसान..कंपनीच्या हेडनी स्पष्टच सांगितलंटेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या टॅरिफ दरवाढ आणि मोफत ऑफर्स कमी करण्याचे सत्र सुरू आहे. एअरटेलचा हा निर्णयही त्याच धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. आता या सुविधेच्या बदल्यात एअरटेल कोणती नवीन ऑफर आणणार की ग्राहकांना केवळ मूळ प्लॅन्सवरच समाधान मानावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर तुम्ही एअरटेल युझर असाल तर तुमच्या Airtel Thanks App मधील रिवॉर्ड्स विभागात जाऊन उपलब्ध असलेल्या इतर सुरू असलेल्या ऑफर्स एकदा तपासून घेणे फायद्याचे ठरेल.