दिल्लीत सर्वाधिक : कर्नाटक अन् महाराष्ट्रात प्रत्येकी दोन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील बोगस विद्यापीठांवरून मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पूर्ण देशात 32 संस्थांना बोगस विद्यापीठ घोषित केले आहे. या संस्थांमधून मिळणारी पदवी नोकरीसाठी तसेच पुढील शिक्षणासाठी मान्य नसेल असे आयोगाने स्पष्ट पेले आहे. कुठल्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता पडताळून पाहण्याचा सल्ला युजीसीने विद्यार्थ्यांना दिला आहे. आयोगानुसार या संस्थांना केंद्र सरकार तसेच कुठल्याही राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली नाही.
युजीसी कायद्याचे कलम 2 (फ) आणि 3 अंतर्गत केवळ मान्यताप्राप्त संस्थेलाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. अशास्थितीत या बोगस विद्यापीठांकडून मिळणाऱ्या पदवीची कुठलीच कायदेशीर वैधता नसल्याचे युजीसीने सांगितले आहे.
दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे
युजीसीच्या यादीनुसार दिल्लीत सर्वाधिक 12 बोगस विद्यापीठे आढळून आली आहेत. यानंतर उत्तरप्रदेशात 4 संस्था बोगस आढळून आल्या. उर्वरित राज्यांमध्येही काही संस्था मान्यतेशिवाय चालू असल्याचे समोर आले आहे.
राज्यनिहाय बनावट विद्यापीठांची संख्या
दिल्ली १२
उत्तर प्रदेश ४
आंध्र प्रदेश २
कर्नाटक २
केरळ 2
महाराष्ट्र 2
पु•गेरी २
पश्चिम बंगाल 2
अरुणाचल प्रदेश १
हरियाणा १
झारखंड १
राजस्थान १
विद्यार्थ्यांना खास सल्ला
कुठल्याही संस्थेत प्रवेश घेण्यार्पी त्याच्या मान्यतेची पडताळणी करा असा सल्ला युजीसीने विद्यार्थी आणि पालकांना दिला आहे. बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि कारकीर्द तिन्हींना फटका बसू शकतो. देशात उच्चशिक्षणाच्या वाढत्या व्याप्तीदरम्यान अनेक संस्था मान्यतेशिवाय विद्यापीठाचा दावा करत काम करत आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांना सतर्क राहणे आणि योग्य माहिती घेऊनच प्रवेश घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.