Two blunders by Team India R Ashwin statement: भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८मधील पहिल्याच सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताला १११ धावांवर गुंडाळले. या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणनीतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यात माजी गोलंदाज आर अश्विनने थेट चुका दाखवून गौतम गंभीर व सूर्यकुमार यादव यांचा समाचार घेतला आहे. भारताने या सामन्यात अक्षर पटेल याला का खेळवले नाही, हा चर्चेचा विषय आहेच.
आर अश्विननेही भारतीय संघाने अक्षर पटेलला डावलून वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याच्या निर्णयावर टीका केली. त्याशिवाय त्याने रिंकू सिंगला आठव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावरही सुनावले.
तो म्हणाला, संघ संतुलनासाठी आयपीएल चांगली आहे, हे मी मान्य करतो, परंतु, तुम्हाला १४ सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला संघ बदलावा लागेल.पण, अशा आयसीसी स्पर्धांमध्ये तुम्ही संघ जितका स्थिर ठेवू शकाल तितके चांगले. डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरचा वापर करावा लागेल याच्याशी मी १००% सहमत आहे; तुम्हाला त्याला खेळवावे लागेल, मी या सर्वांशी सहमत आहे. पण, अक्षर पटेल हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील तुमचा क्रिकेटमध्ये तुमचा MVP आहे. अक्षर पटेलने काय केले आहे ते विसरू नका," असे अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
IND vs SA : अक्षर पटेलला का वगळले? प्रशिक्षकाचं उत्तर ऐकून चाहत्याचं टाळकं सटकलं; म्हणे, रिंकू सिंग....अश्विनने यावेळी २०२४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलची आठवण करून दिली. या सामन्यात अक्षर पटेलने विराट कोहलीसोबत ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती आणि संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवले होते. अक्षरने रविवारीही आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करून दाखवली असती.
"मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अशीच परिस्थिती होती. तेव्हा अक्षर पटेल त्याच परिस्थितीत फलंदाजीला आला होता. त्याने विराट कोहलीसोबत भागीदारी केली आणि भारताने १७० धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडे काही विकेट्स हातात असती आणि मधल्या षटकांमध्ये स्थिरता असती, तर त्यांनी लक्ष्याचा पाठलाग केला असता," असे अश्विनने ठामपणे सांगितले.
रिंकू सिंगला आठव्या क्रमांकावर पाठवण्यात काय अर्थ, असा सवालही अश्विनने केला. तो म्हणाला, तुमच्याकडे ८ फलंदाज आहे आणि तुम्ही रिंकूला आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवता. त्याला त्या क्रमांकावर पाठवू शकत नाही. यात मला वॉशिंग्टंन सुंदरचा अपमान करायचा नाही. तोही चांगला फलंदाज आहे, पण रिंकूला पुढे पाठवायला हवं होतं. त्याच्याकडे चांगले फटके खेचण्याची कला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातून भारताने हे शिकायला हवं.