'कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाचे'
esakal February 25, 2026 07:45 AM

मार्केट यार्ड, ता. २४ : ‘‘विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत, असे मत कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी व्यक्त केले.
कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचलित मोतीलाल तालेरा इंग्लिश मीडियम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ), मोशी येथे ‘लक्ष्य – मोठी स्वप्ने पाहा’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावेळी संचेती बोलत होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध नृत्य, नाट्य आणि संगीत सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी व्यवस्थापन समितीचे खजिनदार सुभाष अगरवाल, सदस्य जवाहरलाल बोथरा, प्राचार्या सीमा शादबर आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.