26868
बांद्यातील केंद्रशाळेत
डिजिटल संगणक लॅब
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत पाऊल टाकत पीएम श्री केंद्रशाळा बांदा क्र. १ येथे सुसज्ज डिजिटल लॅबचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच आबा धारगळकर, श्वेता कोरगावकर, नरसिंह काणेकर, श्याम मांजरेकर, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, सुस्मिता जाधव, राजाराम सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, सदस्य हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, संपदा सिद्धये, श्रद्धा नार्वेकर आदी उपस्थित होते. श्री. कामत यांनी शाळेच्या प्रगतीसाठी व भावी योजनांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी प्रास्ताविकातून डिजिटल लॅबची संकल्पना स्पष्ट करताना शाळेसमोरील विविध अडचणी व भविष्यातील नियोजन याविषयी मत मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.