26888
सिंधुदुर्गच्या जलकन्येचा मुंबईत डंका
पूर्वा गावडेला रौप्य; ४१ मिनिटांत पाच किलोमीटर पार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात पार पडलेल्या राष्ट्रीय ‘संक रॉक ओशन स्विमथॉन’ या सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने ४१.१६ मिनिटांत ५ किलोमीटर अंतर पार करत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. दुसऱ्या क्रमांकाची ती वेगवान जलतरणपटू ठरली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र अमेच्यअर एकवाटीक असोसिएशनच्यावतीने असोसिएशनचे सेक्रेटरी राजू पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६२ वी संक रॉक ओशन स्विमथॉन ही राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा रविवारी (ता. २२) मुंबईच्या समुद्रात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह सहा राज्यांतील विविध गटात ३३० जलतरणपटू सहभागी झाले होते. लाटावर स्वार होत सर्वच स्पर्धकांनी विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली.
------
दुसऱ्या क्रमांकाची वेगवान जलतरणपटू
या सागरी जलतरण स्पर्धेत मुलींच्या गटातून सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने दमदार कामगिरी करत मुंबईच्या समुद्रात ४१.१६ मिनिटांत ५ किलोमीटर अंतर पार करत रौप्यपदक पटकावले. ती दुसऱ्या क्रमांकाची वेगवान जलतरणपटू ठरली. पूर्वाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र अमेच्यअर एकवाटीक असोसिएशनचे असोसिएशनचे सेक्रेटरी राजू पालकर यांनी खास अभिनंदन केले आहे. सध्या ती पुणे बालेवाडी येथे जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे.